मुंबई : आमचे महायुतीचे सरकार आल्यानंतर संजय राऊतला (Sanjay Raut) उडता महाराष्ट्र आठवला आहे आणि आज सकाळी उडता नाशिक आठवला. यांच्या मविआच्या (MVA) काळात जसं काय सर्व ड्रग्स माफिया जेलमध्ये होते, यांनी ड्रग्स बाबत कडक भूमिका घेतली होती, अशाच प्रकारे हा तावातावाने सकाळच्या प्रेसमध्ये बोलत होता. बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर त्याने टीका केली. संजय राजाराम राऊतला आठवण करुन देईन की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर असंख्य ड्रग्स माफीये आहेत, असंख्य अंमली पदार्थांची तस्करी करणारे आहेत, असंख्य अनधिकृत पद्धतीने राज्यामध्ये राहणारे रोहिंगे आणि बांगलादेशी आहेत त्यांना वठणीवर आणण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांनी केलेलं आहे, अशा जोरदार शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना सुनावले.
नितेश राणे म्हणाले, तुझ्यासारखे कैदी नं. ४२० जे कामगारांची खिचडी चोरी करतात आणि आपल्या कुटुंबियांच्या अकाऊंटमध्ये वाटतात. तुझा मालक आणि तुझ्या मालकाचा मुलगा जो अमली पदार्थाचा महाराष्ट्रामध्ये बादशहा आहे त्या सगळ्यांना वठणीवर आणायचं आणि सरळ करायचं काम आमच्या देवेंद्रजींनी केलेलं आहे. त्यामुळे रश्मी शुक्ला यांचे नाव ऐकल्यावर याच्या मालकावर झोपेची गोळी घ्यायची वेळ आली, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
तुला जर ड्रग्स विरोधात मोर्चा काढायचा असेल तर नाशिकपेक्षा मातोश्री आणि दिनो मौर्याच्या घरी काढ. कारण तुझ्या मालकाचा मुलगा त्यावेळी रोज संध्याकाळी तिथे काय फराळ घ्यायचा याचा मेन्यू जर मी उघड केला तर तुला कळेल की अडीच वर्षांत उडता महाराष्ट्र कोणी केला. आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळे महाराष्ट्रात चुकीचं काम करण्याची कोणाची हिंमत होत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
ज्या माणसाला तुम्हीच शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर फोटो काढण्यासाठी आणलं तेव्हा कळलं नाही की उद्धव ठाकरेंनी यांच्याबरोबर फोटो काढू नये? तेव्हा सगळ्यांबरोबर फोटो काढत बसला होतात. आणि आता आमच्या मंत्र्यांवर आणि आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करताय? म्हणून ड्रग्स आणि अमली पदार्थात कोणी पीएचडी केली असेल तर तो तुझ्या मालकाचा मुलगा आहे. कर्जतच्या फार्म हाऊसच्या फ्रीजमध्ये काय काय ठेवलंय हे बघ. चुकून धाड पडली तर आयुष्यभर पुरेल असा साठा सापडेल. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांवर टीका करु नकोस नाहीतर तुझ्या मालकाच्या मुलाची प्रमुख भूमिका असलेला ‘उडता महाराष्ट्र’ हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रभर प्रदर्शित करु, असं नितेश राणे म्हणाले.
आज खासदार सुनील तटकरे म्हणाले की उद्धव ठाकरे भाजपसोबत येण्यासाठी तयार होते. त्यांनी तसं आदरणीय पंतप्रधानांना दिल्लीला जाऊन सांगितलं होतं. त्याच गोष्टीबद्दल या खोटारड्या संजय राऊतने आता म्हटलं की मी बोललोच नाही. त्याच्या कुटुंबाने स्वतःचे संरक्षण वाढावे म्हणून स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करून घेतला, त्याच्या शब्दाला काय किंमत आहे? अशी टीका नितेश राणे यांनी केली.
सुनील तटकरे म्हणाले ते खरंच आहे, पण उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत येण्याची इच्छा का दाखवली? कारण तेव्हा श्रीधर पाटणकर यांच्या घरी रेड पडली होती. नंदकिशोर चतुर्वेदी जो आज फरार आहे त्याच्याबरोबर असलेल्या काळ्या धंद्याच्या संदर्भात या उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर तेव्हा रेड झाल्या होत्या. शिवसैनिक आणि हिंदूंना वाचवण्यासाठी हे कधी पंतप्रधानांना भेटले नाहीत, पण स्वतःच्या मेव्हण्याला वाचवण्यासाठी मी भाजपात येतो, असं हे म्हणाले. तुझा मालक हा किती मोठा दुतोंडी साप आहे, किती मोठा सरडा आहे, हे अख्खा महाराष्ट्र ओळखून आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…