Thursday, July 18, 2024
HomeदेशTrain Accident: बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे २१ डबे रूळावरून घसरले, ४ जणांचा...

Train Accident: बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे २१ डबे रूळावरून घसरले, ४ जणांचा मृत्यू

बक्सर: दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल येथून आसामच्या कामाख्यापर्यंत जाणाऱ्या १२५०६ नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे(north east express) २१ डबे बुधवारी बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून घसरले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो जण जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे ६ डबे खूपच वाईट पद्धतीने रूळावरून घसरले. या डब्यांमधील अनेक प्रवासही अद्यापही अडकलेले आहेत. या कारणामुळे प्रवाशांची स्थिती खूपच नाजूक आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे.

 

पाटणा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. बक्सरशिवाय आरा आणि पाटणा येथून डॉक्टरांची टीम अॅम्ब्युलन्ससह रवाना झाली आहे. यातच बक्सरचे खासदार अश्विनी चौबे हे ही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री ९.३५ मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताबाबद बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, रेल्वे रूळावरून घसरल्याची माहिती मिळताच संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, बिहार सरकार तत्परतेने पीडित तसेच जखमींच्या बचावकार्यात व्यस्त आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -