मुंबई : आजचा सामनाचा अग्रलेख वाचल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे. याचं कारण असं की, नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडियाचं आयोजन करणार्या आयोजकांना जेव्हा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आवाहन केलं की, आतमध्ये खेळण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येणारे लोक हिंदूच आहेत यासाठी आधारकार्ड तपासा आणि मगच त्यांना आत पाठवा. यावर जे ‘हिंदूद्वेषी’ आहेत ते बोलले, अशी सणसणीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत हिंदूंचा द्वेष करणार्या उबाठाच्या नेत्यांना नितेश राणे यांनी चांगलेच फटकारले.
नितेश राणे म्हणाले, हिंदूद्वेषींचा मालक मविआच्या काळात मुख्यमंत्री असताना सर्वांत जास्त हिंदू सणांवरच निर्बंध आणले गेले. पण महायुतीच्या काळात आम्ही हिंदूंची बाजू घेऊन मोठ्या प्रमाणावर हिंदू सण साजरे करत असू तर आम्हाला शिव्याशाप देणारे हे चायनीज मॉडेल हिंदुत्ववादी आहेत. ते औरंगजेबाच्या विरोधात बोलत नाहीत, सनातन धर्माचा अपमान झाला तरी यांनी हिंदूंची बाजू घेतली नाही. जे काम हमास पॅलेस्टाईनमध्ये करत आहे, तीच भूमिका काँग्रेस आपल्या देशामध्ये बजावत असतानाही त्या काँग्रेसला कधी खडे बोल ऐकवताना यांना आपण ऐकलं नाही. जे दोन ओवेसी बंधू सतत हिंदूंविषयी गरळ ओकतात त्यांची थोबाडं बंद करण्याची यांच्यात हिंमत नाही आणि कोणी हिंदूंची बाजू घेत असेल तर लगेच यांना मिरच्या झोंबतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
आज सकाळी राम मंदिराविषयी बोलताना हे आम्ही त्या ठिकाण होतो, आम्ही हे केलं, ते केलं असे दाखले देत होते. या गजनी झालेल्या संजय राजाराम राऊतला मी सांगेन की गजनी चित्रपटात आमिर खान जसं अंगावर लिहून ठेवतो तसं अंगावर लिहा की राम मंदिराचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा संजय राऊत लोकप्रभामध्ये बसून राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या पूर्ण विरोधात लेख लिहित होता. माझ्याकडे ते लेख आहेत. ते त्याच्या शरीरावर चिकटवून मी त्याला मुंबईभर फिरायला लावू शकतो.
उद्धव ठाकरे तर राम जन्मभूमी आंदोलनावेळी घरात बसून कॅमेरा साफ करायचे, त्यामुळे त्यांचा आणि राम जन्मभूमीचा काही संबंधच नाही. असे लोक जेव्हा आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचारतात की तुम्ही नेमकं काय केलं, तेव्हा लक्षात घ्या की राम जन्मभूमी आंदोलनावेळी तुम्ही गोधडी ओली करायचं काम करायचे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी केली.
ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क देण्यात आले यावर नितेश राणे म्हणाले की, काही शेंबडे लोक एकत्र येऊन काँग्रेसचे गुणगान गाणार असतील, हमासने पॅलेस्टाईनमध्ये किती चांगलं काम केलं हे बोलण्यासाठी उद्धव ठाकरे तिथे येऊन भाषण देणार असतील तर अशा शेंबड्या लोकांना थोडं बोलू द्यावं म्हणून महानगरपालिकेने त्यांना परवानगी दिली असेल, त्यात काही मोठी गोष्ट नाही. अशा कितीतरी मित्रमंडळांच्या सभा मुंबईमध्ये सगळीकडे होतच असतात.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा गौप्यसेफोट केला. यावर नितेश राणे म्हणाले की, हा गौप्यसेफोट नाही तर ते खरंच आहे. नारायण राणे साहेबांनी देखील जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न करण्यात आला. हे राणे साहेबांनी देखील वारंवार सांगितलं आहे आणि आम्हीही सांगत आहोत. उद्धव ठाकरे हा माणूसच असा आहे, त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांनी का सहानुभूती दाखवावी, हा मोठा प्रश्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…