Chhagan Bhujabal : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते

Share

शरद पवारांसोबत कुणी नसताना मी साथ दिली ही माझी चूक?

मंत्री छगन भुजबळांनी केले गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादी पक्षात (NCP) सध्या चिन्ह आणि पक्षाच्या नावावरुन जोरदार संघर्ष सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे दोन्ही गट राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचा दावा करत आहेत. अजित पवार गटाने शरद पवारांवर अनेक आरोप करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत तर अजिदादांच्या गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवडीवर आक्षेप घेतला. यानंतर आता सर्वांच्या नजरा ९ नोव्हेंबर रोजी होणार्‍या शरद पवार गटाच्या युक्तिवादाकडे लागल्या आहेत. मात्र त्याआधीच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) नेतृत्वात भाजपात जायचे हे शरद पवारांच्या घरीच ठरले होते, त्यानंतर पवारांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार भाजपासोबत जाणार नव्हते, परंतु मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवतो, त्यानंतर तुम्हाला हवं ते करा असं म्हणाले होते. परंतु अजितदादांच्या माहितीनुसार पुढे १५ दिवस घरात चर्चा झाली. शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यांनी राजीनामा दिला तर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करायचे. त्यानंतर आपण भाजपासोबत सरकारमध्ये जायचे हे शरद पवारांच्या घरी ठरले त्यामुळे अचानक त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राजीनामा दिला होता असं भुजबळांनी म्हटलं.

शरद पवारांसोबत कुणी नसताना मी साथ दिली ही माझी चूक?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर येवला इथे शरद पवारांनी घेतलेल्या सभेत भुजबळांना तिकीट देऊन चूक केली असं म्हटलं होतं. शरद पवार म्हणाले होते की, मी आज इथे माफी मागायला आलो आहे. माझा अंदाज फारसा चुकत नाही, परंतु इथे माझा अंदाज चुकला असं ते म्हणाले होते. त्यावर भुजबळांनी पलटवार करताना सांगितले की, चुकलो म्हणजे काय, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता असताना मी तुमच्यासोबत आलो, तेव्हा कुणी तुमच्याबरोबर नव्हते. मी मजबुतीने उभा राहिलो. मी सांगू का माझी चूक झाली, अशा चुका मी पण खूप केल्या असं त्यांनी म्हटलं.

भुजबळांचे काय गौप्यस्फोट केले?

भुजबळ म्हणाले की, २०१४ ला वेगवेगळ्या निवडणुका लढण्याचे आधीच ठरले होते. भाजपाने शरद पवारांना सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे लढतो, तुम्ही काँग्रेसला सोडा, मग ४ पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीनंतर काही दिवस भाजपा सरकार चालवेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होईल असं आधीच ठरले होते ही पवारांची रणनीती होती. २०१७ मध्ये राष्ट्रवादी-भाजपात चर्चा झाली, कुणाला किती मंत्रिपदे, किती जागा, पालकमंत्री, महामंडळे किती सगळे काही ठरले. त्यानंतर मग शरद पवारांनी भाजपाला अट घातली की, आम्ही तुमच्यासोबत येतो, परंतु शिवसेना नको. त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वीही भाजपासोबत चर्चा झाली होती.

शरद पवार, प्रफुल पटेल, अजित पवार, जयंत पाटील ही मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती. शिंदे येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही हीच मंडळी भाजपासोबत चर्चा करत होती. अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी झाला, भाजपासोबत चर्चेवेळी अजित पवार होते, अजित पवारांनी शब्द दिला होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला. ते बंड नव्हते तर आधी ठरले होते. अजित पवारांनी धोका दिला नाही तर अजित पवारांनी शब्द पूर्ण केला. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी जे विधान केले ते सत्य आहे. २०१९ ला पहाटेचा शपथविधीवेळी कुणी धोका दिला हे समोर आहे. अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येतील असं वाटत नाही. जे मतभेद निर्माण झालेत ते मिटतील असं नाही, असं भुजबळ म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादीतील संघर्ष आणखी काय काय वळणं घेणार, हे पाहावं लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

44 mins ago

MP News : दिल्लीतल्या बुरारी प्रकरणाची मध्यप्रदेशात पुनरावृत्ती! दिवसही १ जुलैचाच!

मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…

2 hours ago

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत भाजपाने उधळला पहिला गुलाल

कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष…

2 hours ago

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…

2 hours ago

Kolhapur News : कोल्हापूरच्या दूधगंगा नदीत दोघांचा बुडून मृत्यू!

पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…

2 hours ago

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…

2 hours ago