मुंबई: ग्रहण(eclipse) ही सर्वात महत्त्वाची खगोलीय घटना आहे. २०२३ या वर्षात एकूण ४ ग्रहण लागणार आहेत. यावर्षाचे दुसरे ग्रहण सर्वपित्र अमावस्येला असणार आहे. जाणून घेऊया वर्षातील दुसऱ्या सूर्य आणि चंद्रग्रहणाबद्दस…
कधी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण
ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण लागत आहेत. यावेळेस १५ दिवसांच्या अंतराने दोन ग्रहण लागणार आहेत. वर्षातील सूर्य ग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ शनिवारी लागणार आहेत. सूर्यग्रहण १४ ऑक्टोबरच्या रात्री ८.३४ मिनिटांनी लागणार असून रात्री २.२५ मिनिटांपर्यंत असणार आहे. ६ तास हे सूर्यग्रहण असणार आहे. या दरम्यान सूतक काल महत्त्वाचा आहे. वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे.
सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सूतक काल लागणार आहे. सूतक काळ शुभ मानला जात नाही. या दरम्यान धार्मिक कार्ये केली जात नाहीत. यावेळचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळही मानला जाणार नाही.
कधी आहे वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण
वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण सूर्य ग्रहणाच्या १५ दिवसांनी म्हणजेच २९ ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रात्री १.०५ मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरू होईल जे २.२४ मिनिटांनी संपेल. १.२० मिनिटे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. हे ग्रहण पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतात दिसेल त्यामुळे याचा सूतक काळही अशणार आहे. चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधी सुरू होतो. यासाठी २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ४ वाजता सूतक काळ सुरू होईल.
ग्रहणादरम्यान काय करू नये
ग्रहणादरम्यान खाऊ नये
या दरम्यान धार्मिक कार्ये करू नयेत