Fire: तामिळनाडूत फटाक्यांच्या कंपनीला भीषण आग, १० जणांचा मृत्यू, १३ जखमी

अरियलूर: तामिळनाडूच्या(tamilnadu)अरियलूर जिल्ह्यात सोमवारी एका फटाका कंपनीत लागलेल्या भीषण आगीत(fire) तब्बल १० जणांचा मृत्यू झाला तर १३ इतर जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी आपल्या विधानात या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे.


ही घटना तामिळनाडूच्या विरालगुर गावातील एका खासगी फटाका कंपनीत झाली. फॅक्टरीमध्ये आग कशी लागली याचे कारण शोधले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ५ जखमी लोकांवर तंजावूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.



मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा


मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला प्रत्येकी तीन लाख रूपये तर गंभीर जखमींना एक लाख रूपये आणि साधारण जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजारांची मदतीची घोषणा केली आहे.


प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तेथे देशी फटाके तसेच अत्यंत ज्वलनशील रसायने होती. ही रसायने सांभाळताना घर्षणामुळे स्फोट झाला. यामुळे भीषण आग लागली. आगीत होरपळल्याने मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनतर तेथे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीत एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुचाकी वाहनांसह अनेक वाहने जळून खाक झाली.

Comments
Add Comment

Monsoon Update 2026 : भारतात मान्सूनचा हाहाकार! अनेक राज्यांत पूर, दरडी कोसळल्या; IMD कडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

गुजरातसह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाचे थैमान नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा मंदावलेला

Assam Flood Updates : आसाममध्ये पुराचा हाहाकार : २४ तासांत १० जणांचा मृत्यू; शिवसागर आणि जोरहाटला सर्वाधिक फटका

दिसपूर : आसाममध्ये पावसाचा जोर ओसरण्याचे नाव घेत नसून पुराचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. राज्यातील

Bengaluru Triple Murder : AIच्या मदतीने रचला 3 खुनांचा कट; बंगळुरू ट्रिपल मर्डरप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बंगळुरू : बंगळुरूमधील चर्चेत असलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या (Triple Murder Case) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

PM Narendra Modi : पेपरफुटीवर अखेर पंतप्रधान मोदी बोलले! फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा; आंदोलक विद्यार्थ्यांना दिलं मोठं आश्वासन

दिल्ली: देशभरात चर्चेत असलेल्या नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावर केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय जाहीर केला आहे.

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात हिस्ट्रीशीटर हाफी अफजलची एन्ट्री? व्हायरल व्हिडिओनंतर चौकशीला वेग

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात हिस्ट्रीशीटर (History-Sheeter) हाफी

Student Protest : भाजपचे निशिकांत दुबे यांची पोस्ट व्हायरल; जंतर-मंतर आंदोलनावरून राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यावर टीका

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर खासदार (BJP) निशिकांत