World cup 2023: भारताची विश्वचषकात विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

चेन्नई: आपल्याच मायभूमीवर होत असलेल्या विश्वचषक २०२३(world cup 2023) मध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने ६ गडी राखत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेले २०० धावांचे माफक आव्हान भारताने ६ गडी आणि ५२ बॉल राखत पूर्ण केले.


ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २०० धावांचे आव्हान पाहिल्यावर भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटले होते. मात्र सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने भारताला जबरदस्त धक्के दिले. मात्र त्यानंतर भारतीय संघ सावध झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला.


लोकेश राहुलचे शतक ३ धावांनी हुकले. त्याने ९७ धावा केल्या. तर विराट कोहलीने ८५ धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताला हा सहज वाटणारा विजय साकारता आला. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यरलाही एकही धाव करता आली.


मात्र कोहली आणि लोकेश राहुलने संयम राखत भारताला मोठा विजय साकारून दिला. कोहली ८५ धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्या आला. त्याने ११ धावा केल्या.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ १९९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ४१ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही.

Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या