India Vs Australia: विश्वचषकात भारताची आज पहिली परीक्षा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार सामना

Share

चेन्नई: भारतीय संघ आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३मध्ये(world cup 2023) आपल्या अभियानाची सुरूवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(india vs australia) सामन्याने करत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना आज ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे तर भारतीय संघाने दोन वेळा. अशातच ऑस्ट्रेलिया संघात असे खेळाडू आहेत जे या महामुकाबल्यात टीम इंडियाचे टेन्शन वाढवू शकतात.

डेविड वॉर्नर – ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नरला भारतात खेळण्याचा खूप अनुभव आहे. गेल्या काही काळापासून तो वनडे क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आहे. दरम्यान, वनडे मालिकेत त्याने तीन सामन्यांत अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे डेविड वॉर्नरला रोखणे हे भारतीयांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

स्टीव्ह स्मिथ – या सामन्यात भारतासाठी सगळ्यात मोठा धोका म्हणजे स्टीव्ह स्मिथ. स्मिथने भारताविरुद्ध आतापर्यंत २७ वनडे सामन्यात १२६० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५४.७८ इतकी आहे. क्रीजवर सेट झाल्यानंतर स्मिथला बाद करणे कठीण असते.

मिचेल स्टार्क – या गोलंदाजापासून भारताला सावध राहावे लागेल. स्टार्क खासकरून टीम इंडियाचे सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना आपली शिकार बनवतो. भारताविरुद्ध १७ वनडे सामन्यात स्टार्कने २६ विकेट घेतल्या आहेत.

पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलियाचचा कर्णधार पॅट कमिन्सचे नाव दमदार गोलंदाजांमध्ये घेतले जाते. पॅट कमिन्सवर ताबा मिळवणे कठीण आहे. त्याने भारताविरुद्धच्या १९ वनडे सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत.

अॅडम झाम्पा – ऑस्ट्रेलियाला लेग स्पिनर अॅडम झाम्पा भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो. झाम्पाने २१ वनडे सामन्यात भारताने ३४ विकेट घेतलेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दूल ठाकुर.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश हेझलवुड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबुशेन, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, एडम जाम्पा, मिचेल स्टार्क.

Recent Posts

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

1 hour ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

1 hour ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

2 hours ago

Hathras Stampede : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील भोलेबाबाचा गलिच्छ प्रकार उघडकीस!

भोलेबाबा करायचा दुधाची अंघोळ; खीर बनवून वाटला जायचा प्रसाद लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या…

2 hours ago

Pune Crime : पैसे परत न केल्याने शिक्षित डॉक्टरने कोयता हाती घेत केला तरुणाचा खून!

गुंडांच्या साथीने पुण्यात डॉक्टरचे भयानक कृत्य पुणे : पुण्यात सातत्याने चित्रविचित्र गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime)…

4 hours ago

Pune porsche accident : अखेर धनिकपुत्राने लिहिला ३०० शब्दांचा निबंध!

बालहक्क मंडळाकडे वकिलांमार्फत केला सादर पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत…

5 hours ago