Friday, July 11, 2025

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Shivsena MLA Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली: शिवसेनेच्या आमदार अपात्रता सुनावणीची(Shivsena MLA Disqualification Case)  तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी चौथ्यांदा तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी येत्या ९ ऑक्टोबरला होणार होती. मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलत आता ३ नोव्हेंबरला सांगितली आहे.


सुनावणी पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी ३ ऑक्टोबरला ही सुनावणी होणार होती. त्यानंतर ६ ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली. मात्र त्यावेळेही ही सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा या तारखेत बदल करण्यात आला असून ही सुनावणी ३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.


सेनेच्या आमदार अपात्रतेप्रकणी सुनावणीसाठी एक वेळापत्रक बनवले जावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार अध्यक्षांनी यासाठी वेळापत्रक तयार केले. या वेळापत्रकाच्या मते १३ ऑक्टोबरला ही सुनावणी केली जाईल.


गेल्या अनेक दिवसांपासून आमदार अपात्रतेप्रकरणाचा मुद्दा प्रलंबित आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ सुरू आहे. त्यातच आता सर्वोच्च न्यायलयाने हे प्रकरण पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने ते पुन्हा लांबणीवर पडले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा