नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यातून (Liquor Scam) कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा ईडीने (ED) केला आहे. या प्रकरणात त्यांना नुकतीच अटक झाली आहे.
दिल्लीतील आता रद्द करण्यात आलेले दिल्लीचे मद्य धोरण तयार करण्यात संजय सिंह यांचा प्रामुख्याने सहभाग होता, त्यांना दिनेश अरोरा यांनी कोट्यवधी रुपये देऊ केले आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे ईडीने म्हटल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिले आहे.
सन २०२१-२२ च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने अटक केली. आम आदमी पार्टीचा तिसरा सर्वोच्च नेता एका केंद्रीय एजन्सीने ताब्यात घेतल्याने दिल्लीच्या सत्ताधारी पक्षाला अर्थात आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अटक झालेले संजय सिंह हे आपचे हायप्रोफाईल नेते आहेत.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…