पुणे : मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुण्यात माजी नगरसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. याच मैत्रीचा फायदा घेत तुझ्या पतीला फोटो दाखवेन आणि सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पीडित नगरसेविकेवर वारंवार अत्याचार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून १० लाख रुपये घेतल्याची धक्कादायक माहिती देखील पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपीकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून पीडित नगरसेविकेने पोलिसांत धाव घेतली.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…