नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे(AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह(sanjay singh) यांना राऊज एव्हेन्यू कोर्टाने इडीच्या रिमांडवर गुरूवारी पाठवले. दिल्लीच्या दारू घोटाळा प्रकरणात ईडीने सुनावणीदरम्यान दहा दिवसांची रिमांड मागितली होती. मात्र पाच दिवसांची रिमांड देण्यात आली. अशातच सिंह आता १० ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय एजन्सीच्या ताब्यात राहतील आणि त्यादरम्यान त्यांची चौकशी केली जाईल.
सिंहला ईडीने बुवारी त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूस्थित सरकारी निवासस्थानावरून अनेक तासांच्या छापेमारी आणि चौकशीनंतर अटक केली होती. ईडीचा आरोप आहे की काही डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी लाच घेतली गेली होती.
प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आपचे नेते संजय सिंह यांनी कोर्टात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरत आहेत. याच कारणामुळे हे लोक असे करत आहेत. तर सिंह यांची बाजू मांडणारे वकील मोहित माथुर म्हणाले, कोणत्या आधारावर अटक करण्यात आली ते सांगावे. आम्हाला रिमांड पेपर देण्यात यावे.
त्यानंतर ईडीने सांगितले की पेपर दिले जातील आणि यानंतर लगेचच रिमांड पेपर देण्यात आले.
ईडीच्या वकीलांना कोर्टात दावा केला की दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन झाले आहे. यात एकूण २ कोटींची देवाणघेवाण झाली. अरोडा यांच्या विधानानुसार ही देण्याघेण्याची बाब फोनवर स्वीकारण्यात आली. केंद्रीय तपास एजन्सीने रिमांड पेपरमध्ये संजय सिंह यांच्या घरी पैशाची देवाणघेवाण केल्याचे म्हटले आहे. यात सांगितले की पहिल्यांदा १ कोटी आणि दुसऱ्यांदा १ कोटींचा व्यवहार संजय सिंह यांच्या घरी झाला.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…