World Cup 2023 : क्रिकेट वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

अहमदाबाद : आयसीसी वनडे विश्वचषकाचा (World Cup 2023) उद्घाटन सोहळा (Opening Ceremony) रद्द करण्यात आला आहे. भारतात रंगणाऱ्या विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.


आयसीसी (ICC) किंवा बीसीसीआय (BCCI) ने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेले नाही. उद्यापासून अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे.


यापूर्वी, बीसीसीआयने विश्वचषक सुरू होण्याआधी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केल्याची बातमी समोर आली होती. ४ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार होता. भारतरत्न माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते विश्वचषकाचे उद्घाटन पार पडणार होते. पण, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, हा उदघाटन सोहळा आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रद्द केला आहे.


या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकार आणि संगीतकार उपस्थित राहणार होते. ज्यामध्ये रणवीर सिंह, अरिजित सिंह, तमन्ना भाटिया, श्रेया घोषाल आणि आशा भोसले यांच्या स्टार-स्टडेड लाईनअपसह फटाके आणि लेझरसह कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. आता मात्र, हा मेगा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. मात्र, आता हा उद्घाटन सोहळा रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींची विशेषत: भारतीयांची निराशा झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयने अद्याप यासंबंधित अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स