Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडी'मेरी मिट्टी मेरा देश' अंतगत नेहरोली येथे कलश संकलन सोहळा संपन्न

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतगत नेहरोली येथे कलश संकलन सोहळा संपन्न

वाडा(वार्ताहर)- पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा(meri mitti mera desh) देश उपक्रम देशभर राबवला जात असून त्या अनुषंगाने वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातील माती कलशामध्ये भरून नेहरोली येथे संकलित करण्याचा भव्य सोहळा मंगळवारी पार पडला.

नेहरोली नाक्या पासून नेहरोली जिल्हा परिषद शाळेपर्यंत अमृत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर नाचत मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.शारदा विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर लेझीम नाच करत पाहुण्यांचे मनोरंजन केले.वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांच्या सूचनेनुसार पार पडला.

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविणे,तालुका पंचायत समिती स्तरावरील माती कलशाचे संकलन जिल्हा परिषद शाळा नेहरोली येथे करणे आणि अमृतवाटीका तयार करण्यासाठी वाडा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा माती कलश संकलन करण्यासाठी वाडा पंचायत समिती सभापती अस्मिता लहांगे, जिल्हा परिषद सदस्य भक्ती वलटे, पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती अमोल पाटील, माजी सभापकल रघुनाथ माळी, गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई कांबळे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत अमृतकलश संकलन सोहळ्या प्रसंगी सरपंच संजना गिंभल, उपसरपंच प्रथमेश भाई ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -