दिल्लीतील ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास केजरीवाल तयार - शरद पवार

नवी दिल्ली : एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp chief) प्रमुख शरद पवार(sharad pawar) यांनी मोठा खुलासा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीत ७ पैकी ३ जागा काँग्रेसला देण्यास तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झालेल्या चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीच्या कारवाईबाबतही विधान केले.


शरद पवार म्हणाले की, संजय सिंह यांच्याविरोधातील ईडीची कारवाई आप आणि काँग्रेसला एकत्र आणेल. ईडीची ही कारवाई ही बदला असल्याचे शरद पवार म्हणाले. तपास विभागाचा वापर त्या नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी केले जात आहेत जे सरकारनुसार चालत नाहीत.



राज्यातील वातावरण भाजपच्या बाजूने नाही


पवार यांनी यावेळी कर्नाटकात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाचा हवाला दिला. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण नाही. महाराष्ट्राबाबत बोलताना पवार म्हणाले, जर निवडणूक झाली तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना मिळून राज्यात सरकार बनू शकते.

Comments
Add Comment

Droupadi Murmu : ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'राफेल'मध्ये स्वार; लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती!

हरियाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Droupadi Murmu ) यांनी बुधवारी हरियाणातील अंबाला हवाई दल स्थानकावर राफेल (Rafale) लढाऊ

कर्नाटकात आरएसएसला दिलासा! कॉंग्रेस सरकारच्या 'त्या' आदेशावर खंडपीठाची स्थगिती

कर्नाटक: सरकारी आवारात कोणतेही उपक्रम आयोजित करण्यापूर्वी खासगी संस्थांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक

CNAP Service : फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना आळा! 'CNAP' सेवेमुळे अनोळखी व्यक्तीचे टेन्शन गेले; सरकारचे मोठे पाऊल

नवी दिल्ली : मोबाईलवर येणारे अज्ञात (Unidentified) कॉल ही अनेक वापरकर्त्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होती. अनोळखी

‘मोंथा’चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली  : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने

आठवा वेतन आयोग मंजूर

पन्नास लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची भेट नवी दिल्ली  : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे.

आंध्र प्रदेशात १०० किमी वेगाने धडकले 'मोंथा' चक्रीवादळ, वादळामुळे एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी

आता वादळाचा प्रवास ओडिशाच्या दिशेने अमरावती : ‘मोंथा’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकून ओडिशाच्या