Ranbir Kapoor: रणबीर कपूरला EDने पाठवले समन्स, सनी लिओनीसह अनेक मोठे स्टार निशाण्यावर

मुंबई: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय समजला जाणारा रणबीर कपूर(ranbir kapoor) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. या अभिनेत्याला महादेव बुक बेटिंग अॅप प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने(ED) समन्स पाठवले आहेत. लवकरच रणबीरला यासाठी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.



ऑनलाईन गेमिंग प्रकरणात अडकला अभिनेता


रणबीर कपूर हा महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकारच्या लग्नात सामील झाल्याने त्याचे नाव या प्रकरणात पुढे आले. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूरला हे समन्स चौकशीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात रणबीर कपूरशिवाय इतर अनेक स्टार्सचीही नावे समोर आली आहे जे ईडीच्या रडारवर आहेत. या यादीत सनी लिओनी, पाकिस्तानी सिंगर आतिफ असलम, राहत फतेह अली खान, बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर, विशाल ददलानी आहेत.



दुबईत झाले होते सौरभ चंद्राकरचे लग्न


रिपोर्ट्सनुसार बॉलिवूडचे अनेक स्टार्स या वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारीमध्ये महादेव बुक अॅप प्रमोटर सौरभ चंद्राकरच्या लग्नात सामील झाले होते. सौरभचे लग्न दुबईत अतिशय ग्रँड पद्धतीने झाले होते. या लग्नासाठी तब्बल २०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. अनेक स्टार्सनी या लग्नात परफॉर्मन्स केला होता.



या सिनेमात दिसणार रणबीर कपूर


कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रणबीर कपूर लवकरच अॅनिमल या सिनेमात दिसणार आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. सिनेमात रणबीर कपूरसह अभिनेता बॉबी देओलही दिसणार आहे. सिनेमा या वर्षी १ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत