Nanded Government Hospital : शिवसेनेच्या खासदाराचा दणका आणि नांदेड रुग्णालयाच्या डीनने साफ केलं स्वच्छतागृह...

याच रुग्णालयात झाले २४ तासांत २४ मृत्यू


नांदेड : नांदेड येथील शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने खळबळ उडाली होती. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारवर बोट उठवलं होतं. परंतु शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी रुग्णालयाचे डीन एस. आर. वाकोडे यांना जाब विचारत त्यांच्याकडूनच स्वच्छतागृह साफ करुन घेतले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओदेखील व्हायरल होत आहे.


रुग्णालयातील मृत्यूंची आकडेवारी समोर आल्याने राज्य सरकारकडून यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या ठिकाणी धाव घेतली आहे. आज शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही या ठिकाणी पाहणी दौरा केला आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही.अशातच औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. याला जबाबदार असणा-या रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.


हेमंत पाटील म्हणाले, मी डीन यांच्या कार्यालयात गेलो, त्यांच्या केबिनमध्ये जे स्वच्छतागृह आहे त्यापैकी एक बंद होते. तर एकामध्ये सामान भरून ठेवण्यात आले होते. बेसिन तुटले आहे, शिवाय पाणी नाही. बालकांचा वॉर्ड आहे, त्याठिकाणची सर्व स्वच्छतागृहं गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. पाणी नाही, स्वच्छता नाही, कोणतीही सोय नाही. गर्भवती वॉर्डमध्ये दारूच्या बाटल्या पडल्या आहेत, डीन यांनी रूग्णालयात फिरलं पाहिजे, परिस्थिती पाहिली पाहिजे असंही पाटील म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना