Navratri 2023 : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीची आतुरता... का साजरी करतात नवरात्र?

जाणून घ्या नवरात्रीमागील आख्यायिका...


गणेशोत्सव (Ganeshotsav) संपला की महाराष्ट्रात चाहूल लागते ती नवरात्रीची (Navratri 2023). गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल याचप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर नवरात्र सण साजरा केला जातो. गरबा (Garba), दांडिया नाईट (Dandiya nights) यांमध्ये तर तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ठिकठिकाणी स्त्रिया आणि पुरुषही या गरब्यामध्ये आवडीने सहभाग घेतात. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजाअर्चा करण्यात येते. काही लोक तर नऊ दिवस उपवास करतात आणि या काळात अनवाणीच फिरतात. यंदा १५ ऑक्टोबरला घटस्थापनेचा मुहू्र्त आहे. मात्र, नवरात्र नेमकी का साजरी करण्यात येते? यामागची आख्यायिका काय आहे? जाणून घेऊयात आजच्या लेखात...



नवरात्रीमागे काय आख्यायिका आहे?


देवीची आरती म्हणताना आपण त्यात महिषासुरमर्दिनी (Mahishasura mardini) असं म्हणतो. पण त्यामागची नेमकी आख्यायिका आपल्यापैकी काही जणांनाच माहित आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस होता. अनेक वर्षे तपश्चर्या करुन त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. माझा कोणत्याही देवता, राक्षस किंवा मनुष्याच्या हातून वध होणार नाही, तो स्त्रीच्या हातून व्हावा, असा त्याने वर मागितला. ब्रह्मदेवाने त्याला वर देऊन टाकला. मात्र, त्यामुळे महिषासुराची ताकद वाढली आणि त्याने देवांचा पराभव करायला सुरुवात केली. सृष्टीच्या निर्मात्या विष्णूला आणि शंकरालाही त्याच्यासमोर हार मानावी लागली.


महिषासुराला हरवण्यासाठी सर्व देव एकत्र आले. त्यांना आदिशक्तीची पूजा केली. त्यानंतर सर्व देवांनी केलेल्या प्रार्थनेतून एक दिव्य प्रकाश निघाला व दुर्गादेवीने सुंदर अप्सरेचे रुप धारण केले. तिला पाहून महिषासुर तिच्यावर भाळला आणि त्याने लग्न करायचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. अप्सरेने मात्र एक अट घातली. तुला माझ्याबरोबर युद्धात जिंकावे लागेल, अशी ती अट होती. महिषासुराने ही अट मान्य केली आणि सलग नऊ दिवस त्यांच्यात युद्ध सुरु राहिले. अखेर दहाव्या दिवशी अप्सरेने महिषासुरावर विजय मिळवला आणि तिला महिषासुरमर्दिनी असं नाव मिळालं. तेव्हापासून नऊ दिवसांकरता नवरात्र सण साजरा करण्यात येऊ लागला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी