मुंबई : आज सकाळी ईडीच्या चार्जशिटमध्ये सुजित पाटकरने दिलेली जी माहिती आहे, ती अतिशय संतापजनक आहे. कोविडच्या काळात ज्यांच्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांचे मृत्यू झाले, त्या प्रत्येकाने पाटकरचं हे वक्तव्य बारकाईने ऐकावं. कोविड काळात मिळणारे टेंडर, कॉन्ट्रॅक्ट्स यासाठी मी संजय राजाराम राऊतचं नाव वापरायचो, असं त्याने म्हटलं. याचा थेट अर्थ असा होतो की कोविड काळात झालेला भ्रष्टाचार, हलगर्जीपणा यांमुळे ज्यांना आपले नातेवाईक गमवावे लागले त्या सर्वांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांना चौकात उभं करुन चपलेने मारलं पाहिजे, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी या तिघांचा चांगलाच समाचार घेतला.
नितेश राणे म्हणाले, यासंदर्भात आज सकाळच्या प्रेसमध्ये संजय राऊतांना आमच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला पण त्यांनी पत्रकारांना दम देताना मी पाहिलेलं आहे. जर हिंमत असेल तर तू त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर पुढच्या पत्रकार परिषदेत मीच येऊन तुला सगळ्याचा जाब विचारेन. मग तुझ्या घरात परिषद घे, किंवा सामनाच्या कार्यालयात. जागा तू ठरव पण आमचं कुटुंब का बरबाद केलं याचं उत्तर तुला द्यावंच लागेल, असं समस्त मुंबईकरांच्या वतीने नितेश राणे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा कार्टा छत्रपती शिवरायांनी वापरलेल्या वाघनखांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. म्हणजे जी भाषा हे जिहादी आपल्या देशात वापरतात, पॉप्युलर फ्रंट, रझा अॅकॅडमीसारख्या संघटना वापरतात, मुंब्राचा जितेउददीन वापरतो, ज्या भाषेत औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवरायांच्या इतिहासावर प्रश्न निर्माण केले जातात, ती भाषा पेंग्विन ठाकरे वापरतो, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्याबद्दल प्रश्न उपस्थित करणार्या आदित्य ठाकरेंना नितेश राणे यांनी याआधीही सुनावले आहे. आज ते म्हणाले की, मविआच्या काळात आदित्यने जो दाओस आणि लंडन दौरा केला त्याची आयटिनरी एका आठवड्यात जाहीर केली नाही तर ती फोटोंसकट मी जाहीर करेन. कोणकोण तिथे होतं, कुठलंही राजकीय पद नसताना वरुण सरदेसाई तिथे का होता, कुठला पाटणकर काढा घेण्यात आला ही सगळी माहिती आमच्याकडे फोटोंसकट आहे. जर दाओसच ठरलं होतं तर लंडनचा दौरा कोणाच्या पैशांनी केला? असा खडा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना सळो की पळो करुन सोडले आहे.
आदित्य ठाकरेंना उद्देशून नितेश राणे म्हणाले, लंडनला जाऊन आवाज सुधारण्यासाठी जो राजकीय पैसा वापरलास त्याने अजूनही तुझ्या म्याँव म्याँवची डरकाळी झालेली नाही. आताही मिस्टर की मिसेस हे विचारावं लागतं. म्हणून उगाच आमच्या नेत्यांवर मंत्र्यांवर, सरकारवर तोंड उघडलंस तर अशी माहिती बाहेर येईल, की आईवडील तुझं लग्नदेखील करु शकणार नाहीत.
संजय राऊत सरकारविरोधी प्रश्न उपस्थित करत असतात याबाबत पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले, संजय राऊत हा स्वतः चोर आहे. त्याचं कॅरेक्टर ढिलं आहे. त्याने कोविडमध्ये चोरीच्या पैशांवर आपल्या मुलीचं लग्न केलं. मुलीच्या लग्नात कोणी सोन्याची बिस्कीटं दिली हे त्याला विचारा. आणि खलिस्तान, पाकिस्तान यांवर त्याने बोलू नये, कारण याच्याच मालकाने मुंबईमध्ये रोहिंगे आणि बांगलादेशी लोकांना पोसलं आहे. त्यामुळे त्याने आधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि मग नरेंद्र मोदीजींचं नाव घ्यावं, असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, कोकणवासियांना यावेळी परतीच्या प्रवासादरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. यासंबंधी नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही रेल्वेमंत्र्यांशी दोनदा बोललो आहोत. आमची अपेक्षा आहे की असा त्रास पुन्हा होऊ नये. कालही दिवा स्टेशनवर लोकांना प्रचंड त्रास झाला. रेल्वे बंद असल्याने मीही सहा वेगवेगळ्या बसेस सोडल्या. मात्र, भविष्यात असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांना जाऊन भेटणार आहोत. त्यांना विनंती करुन हा त्रास कायमचा कसा बंद होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत.
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…