INDIA Alliance : जमावबंदी असताना 'मी पण गांधी' रॅली काढणार्‍या इंडिया आघाडीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात...

मुंबई : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांनी आज मुंबईत फॅशन स्ट्रीटपासून ते मंत्रालयापर्यंत 'मी पण गांधी' पदयात्रेला (Mi pan Gandhi) सुरुवात केली. मात्र, या दरम्यान त्यांना पोलिसांनी अडवल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. जमावबंदी असल्यामुळे पोलिसांनी ही अडवणूक केली मात्र इंडिया आघाडीचे नेते याला न जुमानता आक्रमक झाले. यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


इंडिया आघाडीच्या या पदयात्रेमुळे मंत्रालय परिसरात अचानक कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक गाड्या अडून राहिल्या आहेत व ट्राफिक जाम झाले आहे. मेट्रो सिनेमा - फॅशन स्ट्रीट - हुतात्मा चौक – महात्मा गांधी मार्ग – बाळासाहेब ठाकरे पुतळा – रिगल सिनेमा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – राजीव गांधी पुतळा – मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा, असा या पदयात्रेचा मार्ग ठरला होता. मात्र जमावबंदीच्या कारणास्तव रिगल सिनेमा येथून रॅली सुरु करा, असं पोलिसांचं म्हणणं होतं.


पोलिसांच्या या म्हणण्यावर कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या रॅली पुढे नेणारच अशी आक्रमक भूमिका इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Maharashtra News : राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली

५३.३८ टक्के पाणीसाठा; मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम मुंबई : राज्यातील विविध

Mumbai Environment : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प कार्यान्वित

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड खाडीमध्ये जागतिक

MUMBAI-PUNE WATER LEVEL : मुंबई आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्ही शहरांच्या धरणांमध्ये जोरदार जलसाठा जमा!

मुंबई: महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबई व पुणेकरांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी

BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप