मुंबई: आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकपची सुरूवात होण्यास फक्त काहीच दिवस बाकी आहेत. यावेळेस वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत भारतात केले जाणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की भारत एकटाच या वर्ल्डकपचे यजमानपद भूषवत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११च्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारताने संयुक्तरित्या याचे यजमानपद भूषवले आहे.
या वर्ल्डकपवर साऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील, कारण १२ वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास रचला जाईल अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आहे. भारताने २०११मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवत खिताब जिंकला होता. आताचा हा वर्ल्डकप सणांदरम्यान येत आहे. यावेळेस वर्ल्डकपदरम्यान नवरात्री, दिवाळीसारखे मोठे सण येत आहेत. भारतीय संघांच्या सामन्यावेळीही सणांसारखाच उत्साह असणार आहे.
९ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात १५ ऑक्टोबरपासून होत आहे. नवरात्रीच्या ठीक एक दिवस आधी भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानचा सामना करणार आहे. नवरात्रीदरम्यान भारतीय संघाचे एकूण दोन सामने रंगतील. १९ ऑक्टोबरला भारताचा सामना बांगaलादेशशी होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरला भारताचा न्यूझीलंडशी सामना रंगणार आहे.
वर्ल्डकपदरम्यान १२ नोव्हेंबरला भारतीय संघाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. त्या दिवशी दिवाळीचा सण आहे. अशातच भारतीय संघ जिंकल्यास दिवाळीचा आनंद द्विगुणीत होईल. भारतीय संघ जर सेमीफायनलमध्ये पोहोचला तर ते १५ ऑक्टोबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळतील. १५ नोव्हेंबरला भाऊबीज आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…