नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) रविवारी स्वच्छता अभियानाबाबत(swachh abhiyan) सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान मोदी स्वच्छता अभियानांतर्गत पंतप्रधान मोदी श्रमदान करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ७५ डे हार्ड चॅलेंज पूर्ण कऱणारे हरयाणाचे अंकित बैयनपुरियाही आहे. हे दोघेही साफ सफाई तसेच झाडू काढताना व्हिडिओत दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी जेव्हा २०१४मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते तेव्हा त्या वर्षी २ ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाची सुरूवात केली होती. या अभियानांतर्गत लोकांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ कऱण्याचे आवाहन करण्यात आले होते.
लोकांना आवाहन केले जाते की त्यांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच पर्यावरणाची सुरक्षा करावी. दरवर्षी गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पंतप्रधानांचा व्हिडिओ
पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, आज जेव्हा देश स्वच्छतेवर लक्ष ठेवत आहे त्यावेळी मीी आणि अंकित बैयनपुरियानेही हेच केले आहे. स्वच्छतेशिवाय आम्ही यात फिटनेस तसेच आनंदालाही सामील केले आहे. हे सर्व स्वच्छ आणि स्वस्थ भारताच्या भावनेबाबत आहे.