'माझी वही' कविता आणि काव्यकोडी

माझी वही


आईने आणली
मला वही
म्हणाली यात
हवं ते लिही...

मग आईवरच लिहिली
एक कविता
वाचतो ती मी
येता जाता...

नंतर लिहिली
सशाची कहाणी
आणखी दोन
पावसाची गाणी...

कुणाला सुटेना
अवघड गणित
मीच सोडवले
अचूक वहीत...

हवेच्या दाबाचा
प्रयोगही लिहिला
ज्यात आला होता
नंबर पहिला...

भरपूर विषय
एकाच वहीत
सुचेल तसे
बसलो लिहीत...

आई म्हणाली,
“अरे सारेच यात
वहीचे जणू
अनेक हात”...

शेवटी घेतली
आईची सही
अहो, सजून गेली
माझी वही...

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड 


१) कागद केवढा
आहे ढवळा
कधी काळा
कधी सावळा
रात्री चमचम
चमकत राहतो
दिवसा कोण मात्र
लख्ख होतो?

२) असतो चिवट
काहीसा फिकट
खूप खूप गोड
आरोग्याला जोड
रस फुलांमधला
पोळ्यांमध्ये साठला
काम मधमाशांचं
ओळखा नाव त्याचं?

३) तळ्यामध्ये फुलते
वाऱ्यावरी डोलते
चिखलात राहून
प्रसन्न बोलते
राष्ट्रीय फुलाचा
मिळे त्याला मान
पाकळ्या फुलताच
कोण हसे छान?

उत्तर :- 


१) आकाश

२) मध 

३) कमळ 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आत्मविश्वासाचा मंत्र

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर स्वतःवर विश्वास असेल, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते.” मनुष्याच्या

अडगळ

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ दरवर्षीप्रमाणे मित्राच्या घरी होळीला गेलो. आम्ही सर्व कॉलेजचे मित्र एक एक सण

नदीची गोष्ट

- कथा; रमेश तांबे विजयला फिरण्याचं खूप वेड होतं. शाळेला सुट्टी असली की निघाला विजय फिरायला! पण त्याचं फिरणं होतं

समुद्र खारट का असतो

- विज्ञानकथा; प्रा. देवबा पाटील मंदिरात आराम झाल्यावर त्यांच्या गोष्टी छान सुरू झाल्या होत्या. “ हिमनग व हिमगिरी

ध्रुवांवर सतत बर्फ का असते

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील वम व त्याचे सोबती सहलीवर गेले होते. थकल्याने व जेवण झाल्याने ते महादेवाच्या

अतिलोभ म्हणजे विनाश !

लोभ हा सर्व पापांचे मूळ आहे आणि अतिलोभ हा विनाशाचे कारण ठरतो.”मानवाच्या गरजा मर्यादित असतात; परंतु इच्छा