भिंड : दूध हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. ते शरीर सुदृढ ठेवतं, शरिराला ऊर्जा देतं. जन्माला येताच आईचं आणि वाढत्या वयात गायी, म्हशीचं दूध शरिरासाठी अत्यंत मौल्यवान मानलं जातं. त्यामुळे कितीही महागलं तरी लोक दूध खरेदी करणं थांबवत नाहीत. त्यामुळे ज्या घरी गायी, म्हशी असतात त्या घरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे सदैव लक्ष्मीचा वास असतो. दुधाचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व असतानाही मध्यप्रदेशात एक असं गाव आहे, जिथे दुधाची जणू नदी वाहते, मात्र कधीच विक्री होत नाही. गावकऱ्यांनी दूध विकण्याचा विचार जरी केला, तरी त्यांना काहीना काही अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच येथील लोक दूध नाही, तर दही आणि तूप विक्रीतून उत्तम नफा मिळवतात.
मध्यप्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील कमई गावात जवळपास ३ हजार लोक राहतात. इथे अशी मान्यता आहे की, दूधविक्री केल्यास गावचे देवता हरसुख बाबा शिक्षा देतात. म्हणूनच वाया गेलं तरी चालेल पण दूध विकायला गावकरी घाबरतात. ते असं म्हणतात की, जर कोणी दूध विकण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची म्हैस दूध देणं बंद करते किंवा तिच्या स्तनांमधून दुधाच्या जागी रक्त येऊ लागतं.
कमई गावात दूध न विकण्याची परंपरा मागील ५० वर्षांपासून चालत आली आहे. परंतु या गावात कधीही जा, आपल्याला वेळेला ५० किलो तूप मिळतं. शिवाय बाबांनी शिक्षा करू नये, यासाठी येथील लोक अत्यंत प्रामाणिकपणे तूपविक्री करतात.
त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते. त्यामुळे ग्राहकांना साजूक तूप खायला मिळतं. याच कारणामुळे दूरदूरहून ग्राहक या गावात तूप आणि दही खरेदीसाठी येतात.
कमई गावात हरसुख बाबांचं विशाल मंदिर आहे. मंदिराच्या आसपासच्या गावातील लोकांची त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा आहे. शिवाय त्यांच्याच आशीर्वादाने येथील लोकांकडे भरपूर गायी, म्हशी आहेत ज्या भरपूर दूध देतात आणि त्यामुळे गावकरी सुदृढ आयुष्य जगतात.
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…