देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर


नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे. याचा अर्थ असा की देशात होत असलेल्या विकासाचे फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात गिनी इंडेक्समध्ये ही माहिती समोर आली आहे. या यादीत भारत १६७देशांच्या वर आहे आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक, स्लोव्हेनिया आणि बेलारूसपेक्षा खाली आहे. जगातील ज्या देशांमध्ये उत्पन्नाचे वाटप सर्वांत समान पद्धतीने केले जाते. त्यामध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की भारतातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे.


भारताचा "गिनी इंडेक्स २५.५ आहे, जो देशाची आर्थिक असमानता कमी असल्याचे दर्शवितो. हा स्कोअर स्लोव्हाक रिपब्लिक, स्लोव्हेनिया आणि बेलारूसच्या मागे आहे. परंतु तो चीन (३५.७), अमेरिका (४१.८) आणि जी ७ आणि जी२० देशांपेक्षा चांगला आहे. गिनी इंडेक्स


हा समानता मापनाचा एक प्रकार आहे जो देशात उत्पन्न किंवा संपत्तीचे समान वितरण कसे केले जाते हे सांगतो. त्याचा स्कोअर ० ते १०० पर्यंत असतो. म्हणजे प्रत्येकाचे उत्पन्न अगदी समान आहे आणि १०० म्हणजे सर्व उत्पन्न फक्त एकाच व्यक्तीच्या मालकीचे आहे. भारताचा स्कोअर २५.५ आहे, जो "मध्यम प्रमाणात कमी" असमानतेच्या श्रेणीत येतो. २०११ मध्ये तो २८.८ होता, म्हणजेच अलिकडच्या वर्षांत भारताने समानतेच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे.


प्रधानमंत्री जन धन योजनेमुळे ५५ कोटींहून अधिक बैंक खाती उघडण्यात आली, ज्यामुळे गरिबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले. १४२ कोटींहून अधिक लोकांना आधार कार्डच्या रुपाने डिजिटल ओळखपत्र देण्यात आले, ज्यामुळे सरकारी मदत थेट त्यांच्या खात्यात पोहोचते, याची खात्री होते. यामुळे ३.४८ लाख कोटी रुपयांची बचत झाली. आयुष्मान भारत या योजनेने ४१ कोटींहून अधिक कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवध दिले. सध्या ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. स्टैंड-अप इंडिया आणि पीएम विश्वकर्मा योजना याद्वारे, अनुसूचित जाती/जमाती आणि महिलांना व्यवसायासाठी कर्ज आणि प्रशिक्षण दिले जात आहे. या योजनांच्या योग्य अंमलबजावणीमुळे अंमलय २०११ ते २०२३ दरम्यान १७.१ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आणि देशातील दारिद्रच दर १६.२% वरून २.३% पर्यंत कमी झाला.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र