OBC Reservation : अखेर २१ दिवसांनी ओबीसी समाजाचं उपोषण मागे; फडणवीसांच्या हस्ते केलं जलप्राशन

राज्य सरकार आरक्षणाच्या प्रश्नांत ठरतंय यशस्वी...


चंद्रपूर : राज्यात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा प्रचंड तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण बरंच चर्चेत आलं आणि राज्यभरातील इतर समाजाच्या लोकांनी याचा आपल्या आरक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची खेळी यशस्वी झाली आणि नगरमधील धनगर समाजाने (Dhangar Samaj) आपलं उपोषण मागे घेतलं. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही शिष्टाई यशस्वी झाली असून चंद्रपुरात (Chandrapur) ओबीसी समाजाच्या (OBC Samaj) आरक्षणासाठी गेले २१ दिवस उपोषण करणार्‍या आंदोलक रवींद्र टोंगे, परमानंद जोगी व विजय बल्की यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.


मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रं देण्याची मागणी सरकारने मान्य केली तर त्याचा परिणाम ओबीसी समाजाच्या आरक्षणावर होईल, यामुळे ओबीसी समाजाकडून गेले २१ दिवस उपोषण सुरु होतं. अखेर काल सह्याद्री अतिथीगृहावर सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ओबीसी महासंघानं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले. फडणवीसांच्या हस्ते जलप्राशन करत आंदोलकांनी आपलं उपोषण सोडले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केले आहे की, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नाही व मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या इतरही मागण्या मान्य केल्या आहेत. ओबीसीसाठी १० लाख घरे देण्याची योजना तयार केली. राज्य सरकारला ओबीसींचे हित करायचे आहे. सर्व प्रश्न सुटले नाहीत मात्र प्रयत्न असणार आहे. ओबीसींच्या योजनेसाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. तसेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल प्रवेशात २७ टक्के आरक्षण देऊन संविधानिक दर्जा दिला आहे. शुक्रवारी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत ज्यांना बोलावण्यात आले नाही असे कोणाला वाटत असेल तर त्यांच्या सोबत देखील राज्य सरकार चर्चा करायला तयार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.



ओबीसी महासंघाचे अध्यक्ष काय म्हणाले?


सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नाही ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी शुक्रवारी राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीत मान्य झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपले आंदोलन मागे घेतले असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.


ते म्हणाले, आमचा राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सरकार कोणाच्याही दबावात कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही, मात्र मनोज जरांगे यांचे आंदोलन संपले नाही. त्यामुळे भविष्यात जर का राज्य सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणखी तीव्रतेने रस्त्यावर उतरेल असा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा

Eknath Shinde : आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे”; न्यायालयात फाशीची मागणी करणार

SIT नेमणूक; दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, तपासावर उच्चस्तरीय देखरेख, पॅरोलवर सुटकेला सरकारचा