मुंबई : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळामुळे, शेतकर्यांच्या हितासाठी परदेश दौरा रद्द केला तर पेंग्विन ठाकरेला लगेच गुदगुल्या झाल्या की हे माझ्यामुळेच झालं. विधानसभा अध्यक्षांचा नियोजित घाणा दौरा काही कारणास्तव रद्द झाला तर ठाकरे गटाला वाटलं की हे पण आमच्यामुळेच झालं, त्यामुळे आजकाल महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही घरात पाळणा हलला तर ठाकरे गटाचे पेढे वाटायला सुरुवात करतात, त्यांना वाटतं की हे आमचंच आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी उबाठावर टीकास्त्र उपसले.
नितेश राणे म्हणाले, आज सकाळी संजय राजाराम राऊतने सामनाच्या अग्रलेखात घाणा या देशाबद्दल वक्तव्य केलं. तुमच्या मालकाने मुख्यमंत्री असताना कोरोनामध्ये निष्काळजीपणा केल्याने जे लाखो मृत्यू महाराष्ट्रात झाले मग त्याच्यात आणि घाणाच्या इतिहासात काहीच फरक नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौर्याबद्दल बोलता मात्र महाविकास आघाडीची सत्ता असताना तुमच्या मालकाचा मुलगा दाओसच्या नावाखाली स्पेनमध्ये फुटबॉल मॅच बघायला गेला होता. त्याच्याबरोबर कोणती महिला अधिकारी त्यावेळी फिरत होती याचीही थोडी माहिती घ्यावी.
पुढे ते म्हणाले, एकीकडे बाळासाहेबांच्या नावावर मोठमोठी भाषणं करता मात्र १७ नोव्हेंबर या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हा परदेशातच होता, शिवाय उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये आजारी असतानाही हा बघायला आला नाही. त्यामुळे उगाच दुसर्यांवर टीका करण्यापेक्षा तुमच्या मालकाचा मुलगा दाओसच्या नावाने जे धिंगाणे घालत होता त्याविषयी बोला, असं नितेश राणे म्हणाले.
संजय राऊतला सगळे लुच्चे आणि लफंगे वाटतात, पण स्वतः शिवसैनिक अशी स्वतःची ओळख सांगणारा हा चायनीज मॉडेल शिवसैनिकच सर्वात मोठा लुच्चा आणि लफंगा आहे. दसरा मेळाव्यासाठी ज्या याचिका कोर्टात दाखल झाल्या आहेत त्यांचा विचार करुन कोर्ट योग्य तोच निर्णय घेईल आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा करण्याची परवानगी देईल, त्यामुळे या चायनीज मॉडेल शिवसैनिकांनी एखाद्या मित्र मंडळाच्या नावाखाली छोटासा हॉल बुक करावा आणि तिथे आपला दसरा मेळावा घ्यावा, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…