Government jobs reservation : कुठल्या समाजघटकातील किती शासकीय कर्मचारी? आता थेट सर्वेक्षणच करणार!

राज्य सरकारचा मोठा निर्णय...


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला (Maratha Samaj) आरक्षणाचा शब्द दिल्यानंतर इतर समाजाच्या लोकांनीही आपले आरक्षण अबाधित राहावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यातूनच संघर्ष वाढत चालला आहे. शासकीय सेवेत रुजू करुन घेतल्या जाणार्‍या कर्मचार्‍यांना तरी याचा पुरेपूर लाभ मिळतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षण असतानाही त्या समाजाचे कमी लोक सरकारी नोकर्‍यांमध्ये (Government jobs) असतात, अशी बाब समोर आल्याने आता राज्य सरकार (Maharashtra Government) स्वतः जातीने लक्ष घालून सर्वेक्षण करणार आहे. कुठल्या समाजघटकातील किती कर्मचारी शासकीय सेवेत आहेत याचा एक अहवाल काढला जाणार आहे.


काल झालेल्या एका बैठकीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शासकीय नोकर्‍यांमध्ये ओबीसी (OBC) समाजाला २७% आरक्षण असतानाही केवळ ७ ते ८% लोकच सेवेत आहेत, असा मुद्दा मांडला. या मुद्द्याला विरोध करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आकडेवारी मागवली. त्यामुळे महाराष्ट्रात शासकीय सेवेत कोणत्या जातीचे किती लोक आहेत, याचे सर्वेक्षण होणार आहे.


राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासल्या जाणार आहेत. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मराठा, अशा सर्व समाज घटकांमधील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत. याचे सर्वेक्षण केले जाईल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात

Bhimashankar Accident : भीमाशंकर महामार्गावर भीषण अपघात; 2 रिक्षांना कारची धडक, 12 जण गंभीर जखमी

पुणे : श्रावण महिना, वीकेंडची सुट्टी आणि सोमवार असल्याने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर

Pune Crime : पुण्यात रीलस्टार तरुणीचा 19 वर्षीय तरुणावर हल्ला; दोन तरुणींसह तिघांना अटक

पुणे :  पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात किरकोळ वादातून 19 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली

Maharashtra Weather : पावसाची प्रतीक्षा कायम! कोकण-घाटमाथा वगळता राज्यात जोरदार सरींची शक्यता कमी

मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.