Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीGanesh Immersion : मुरूड एकदरा व मजगाव खाडीतून २११ बाप्पांचे श्री सदस्यांनी...

Ganesh Immersion : मुरूड एकदरा व मजगाव खाडीतून २११ बाप्पांचे श्री सदस्यांनी केले पुनर्विसर्जन…

मुरूड : मुरुड एकदरा व मजगाव खाडीतून सुमारे २११ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीचे श्री सदस्यांनी पुनर्विसर्जन केले. पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे २५ ते ३० श्री सदस्यांनी खाडीमध्ये विसर्जित केलेले प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढण्यास सुरुवात केली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मुरुड एकदरा व मजगाव खाडीतून २११ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती मिळाल्या.

बैठकीच्या माध्यमातून मुरुड मधील श्री सदस्य दरवर्षी या खाडीतील प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती काढून खोल समुद्रात नेऊन विसर्जित करीत आहेत. याही वेळेला हे गणपती काढण्यात आले हे सर्व गणपती बोटीच्या सहाय्याने परिसरातील खोल समुद्रात नेऊन विसर्जित करण्यात आले. मुरुड एकदरा व मजगाव खाडी उथळ असल्याकारणाने पाण्याच्या ओहोटीला या सर्व गणपती मूर्ती वर येतात. या मूर्तींची विटंबना होऊ नये या उद्देशाने हे श्री सदस्य ही सेवा करीत असतात.

शाडू माती पासून तयार होणाऱ्या मूर्ती महाग असल्याकारणाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाडू मातीच्या मूर्ती काही तासातच विरघळतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे बैठकीच्या माध्यमातून नानासाहेब प्रतिष्ठान तर्फे श्री सदस्यांनी शाडू मातीच्या मूर्ती आणाव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणू नयेत असे आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -