भाजपाध्यक्ष नड्डांच्या हस्ते आरती सुरु असताना गणपती देखाव्याच्या कळसाला लागली आग

पुणे : पुण्यातील अंबिलओढा कॉलनी परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणेश देखाव्याच्या कळसाला आग अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरु असताना हा प्रकार घडला. पुढील अनर्थ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावे लागले.



साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे मंडळ आहे. यंदा या मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते इथल्या गणेशाच्या आरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक मंगळवारी संध्याकाळी हा आगीचा प्रकार घडला

Comments
Add Comment

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष

Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; फडणवीसांकडून मोठी भेट, २५०० रोजगार निर्माण होणार

पुणे: पुणे आणि रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित