Bus Accident: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर बस पुलाखाली कोसळल्याने मोठा अपघात

जालना: छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात(bus accident) झाला. यामुळे पूलावरून खाली कोसळली.


या बसच्या अपघाात २५ प्रवासी जखमी झाले तर ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झालेली ही बस पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची होती. ही बस पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जात होती.


यावेळी बदनापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस सरळ रस्त्याच्या कडेला पुलावरून कोसळली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले तर त्यापैकी ४ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. या महामार्गावरील मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ ही दुर्घटना घडली.


अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यातील २९ प्रवाशांपैकी ४ जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

पुणे स्टेशनला दिलासा! एक्स्प्रेस गाड्यांसाठी हडपसर नवे टर्मिनल

पुणे : पुण्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे जंक्शनवरील वाढत्या

जामनेर नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन निवडणुकीच्या रिंगणात!

जामनेर : राज्यातील तब्बल २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे त्याच अनुशंघाने

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष