India-Canada Tension: भारतासोबतचे संबंध आमच्यासाठी महत्त्वाचे - कॅनडा संरक्षणमंत्री

नवी दिल्ली: खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेयरे रविवारी सांगितले की भारतासाठी त्यांचे संबंध किती महत्त्वाचे आहेत ते. त्यांचा देश भारत-पॅसिफिक महासागर रणनीती सारख्या भागीदारांना पुढे कायम ठेवेल.


कॅनडाचे संरक्षण मंत्री ब्लेयर यांनी रविवारी ग्लोबल न्यूजकडून आयोजित द वेस्ट ब्लॉकवर प्रसारित झालेल्या मुलाखतीत म्हटले, आरोपांचा तपास करण्यासाठी कॅनडा भारतासोबतच्या भागीदारी पुढे कायम ठेवेल. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत.



कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी


ग्लोबल न्यूजने कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या हवाल्याने म्हटले की कायद्याचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आपल्या नागरिकांचे रक्षण करणे तसेच हे सुनिश्चित करायचे आहे की आम्ही पूर्ण तपास करू शकू आणि सत्यापर्यंत पोहोचू. जर आरोप खरे सिद्ध झाले तर कॅनडाच्या धरतीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येने आमच्या सार्वभौमिकतेचे उल्लंघन असेल जे कॅनडासाठी मोठी चिंतेची बाब आहे.


ब्लेयर म्हणाले की इंडो पॅसिफिक रणनीती आजही कॅनडासाठी महत्त्वाची आहे आणि या क्षेत्रात सैन्याची उपस्थिती वाढली आहे आणि तसेच पुढील गश्त क्षमतांसाठी प्रतिबद्धता वाढली आहे. ही रणनीती त्यांच्या सैन्य प्राथमिकतांसाठी पाच वर्षांत ४९२.९ मिलियन डॉलरचे योगदान देते.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या