‘एकदा येऊन तर बघा’

  188

सध्या सोशल मीडियावर ‘दिखा दूंगा’ हा ट्रेंड चांगलाच गाजतोय. याच धर्तीवर मराठीत ‘एकदा येऊन तर बघा’ हा नवा ट्रेंड नोव्हेंबर मध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच हा नवा ट्रेंड कोण आणतंय? ‘एकदा येऊन तर बघा’ असं म्हणत, लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला खास चित्रपटरुपी भेट प्रेक्षकांना देणार आहेत. विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे.


‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, विनोदाची वेगवेगळी शैली असणाऱ्या भन्नाट विनोदी कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज प्रेक्षकांना खदखदून हसवणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ प्रेक्षकांसाठी धमाल मनोरंजनाची ट्रीट असणार आहे. सात दिग्गज दिग्दर्शकांच्या घोषित झालेल्या सात मराठी चित्रपटांच्या शृंखलेतील ही दुसरी चित्रपट कलाकृती आहे. या आधीच्या ‘अफलातून’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद लाभला होता.


‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.येत्या २४ नोव्हेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ ही मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या भेटीला येणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा