झाडांचा गळा घोटतोय काँक्रिटचा फास

भारत देश माती जतन संवर्धन करण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर माती गोळा करून मेरी माटी मेरा देश अभियान सुरु आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात मात्र विकासाच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मोकळ्या जागेत काँक्रीटीकरण केले जात असून झाडाच्या बुंद्याला काँक्रिटचा फास आवळला जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध करून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संस्थानी वृक्षांसाठी अत्यावश्यक माती वाचविण्याचे अनोखे अभियान महापालिकेच्या माध्यमातून हाती घेतले आहे.


जिल्हा न्यायालय नाशिक व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार झाडांभोवती १ मीटर साधारण ३ फुटांपर्यंत काँक्रिटीकरण न करण्याचे आदेश प्रशासनास दिलेले असतांना शहरात अनेक वृक्षांभोवती सर्रास काँक्रिटीकरण झाले आहे. झाडांभोवतीचा कॉंक्रिटचा फास सोडविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. महापालिका राबवित असलेल्या "मेरी माटी मेरा देश" अभियान अंतर्गत सुरवात म्हणून पालिकेच्या ताब्यातील उद्यान, मोकळे भूखंडातील वृक्षांभोवतीचे कॉंक्रिट त्वरित काढण्याबाबतचे निवेदन उपस्थित महापालिका प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर यांना निशिकांत पगारे, मनीष बाविस्कर, योगेश बर्वे, सुनिल परदेशी, यशवंत लाकडे व निहाल पाटील यांनी दिले. वृक्षांभोवतीचे काँक्रिटीकरण काढून मेरी माटी मेरा देश अभियानात सहभागी होण्याची पालिकेला नामी संधी असून पर्यावरण झाडांभोवतीचे काँक्रिटीकरण लक्षात आणून देण्यासाठी नागरिकांनी पालिकेच्या NMC econnect app वर संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


माती वाचविण्यासाठी शासन व प्रशासन मोठ मोठे उपक्रम राबवित आहे. नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली स्थानिक प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मोकळ्या जागेत काँक्रीटीकरण केले जात आहे तसेच झाडांच्या बुंध्याना काँक्रीटीकरण करून झाडांची व मातीची (जमिनीची) हानी केली जात आहे, हे दुर्दैव आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील