Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

पुणे : सातत्याने होणारी वाहतूक कोंडी पाहता सरकारने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासाठी नवी योजना आखली आहे. या नव्या योजनेमुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. तसेच प्रवासही आणखी वेगवान होणार आहे.


दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असतो. हा महामार्ग सध्या सहा पदरी आहे. मात्र इतके असतानाही या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तीन तासाच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास घालवावे लागतात.


यावर उपाय म्हणून सरकारने हा महामार्ग आठ पदरी करण्याचे ठरवले आहे. या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ लवकरच याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे.


देशातील सर्वात पहिला महामार्ग अशी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची ओळख आहे. मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारे अंतर या महामार्गामुळे कमी करण्यात आले. मात्र वाढती वाहनसंख्या तसेच येथून प्रवास करणाऱ्यांची वाढलेली संख्या यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरून दररोज ८० हजारापेक्षा अधिक वाहने धावतात.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु