भारत आणि कॅनडामध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना महिंद्रा अँड महिंद्राची उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने कॅनडातून आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती कंपनीने आज भारतीय शेअर बाजाराला दिली.
महिंद्रा अँड महिंद्राची रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये ११.१८ टक्के भागीदारी आहे. कंपनीने स्वेच्छेनं कंपनीचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली. रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर रोजी सर्टिफिकेट ऑफ डिझॉल्युशन मिळाले आहे, अशी माहिती स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. लिक्विडेशन नंतर, कंपनीला अंदाजे २८.७ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 20 सप्टेंबर 2023 रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून आवश्यक कागदपत्रे मिळाली होती, ज्याची माहिती कंपनीला कळवण्यात आली होती. यानंतर रेसनने आपले कामकाज बंद केल्याचे कंपनीने म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2023 पासून ती कंपनीची सहयोगी नाही.
शेअर मार्केटमध्ये खळबळ… या बातमीनंतर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजार बंद होण्याच्या 10 मिनिटे आधी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 3 टक्क्यांच्या घसरणीसह 1584 रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र, व्यवहाराच्या सत्रात कंपनीचे शेअर साडेतीन टक्क्यांनी घसरले आणि दिवसभरातील 1575.75 रुपयांच्या खालच्या पातळीवर पोहोचले. तर एक दिवस आधी कंपनीचे शेअर्स 1634.05 रुपयांवर बंद झाले होते.
दुसरीकडे, कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीच्या मूल्यांकनात 7200 कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. आकडेवारीनुसार, एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 1634.05 रुपये होता आणि कंपनीचे मार्केट कॅप 2,03,025.78 कोटी रुपये होते. आज जेव्हा कंपनीचे शेअर्स 1575.75 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले, तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,95,782.18 कोटी रुपये झाले. अशा स्थितीत कंपनीच्या मूल्यांकनाला 7,243.6 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…