Asian games: छेत्रीची कमाल, एशियन गेम्समध्ये दमदार कमबॅक...

  169

 भारताचा बांगलादेशवर थरारक विजय 


कर्णधार सुनील छेत्रीच्या एकमेव गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाने शेजारील बांगलादेशवर १-० असा थरारक विजय मिळवत एशियन गेम्समध्ये विजयाचे खाते उघडले. याआधी भारताला चीनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र बांगलादेशविरुद्ध दमदार विजय मिळवत भारताने जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय गरजेचा होता. यामध्ये भारताने बाजी मारली.


भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना सुरुवातीच्या हाफमध्ये गोल करण्यात अपयश आले. दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली परंतु त्याचे रुपांतर गोलमध्ये करण्यात ते अयशस्वी ठरले. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. दुसऱ्या डावतही गोल होण्याची शक्यता दिसत नव्हती. सामना गोलविना बरोबरीत सुटण्याच्या दिशेने चालला आहे. मात्र सामन्याच्या ८५व्या मिनिटाला अखेर ही कोंडी सुटली. भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीने गोल करत भारतीय संघाच्या गोलचे खाते उघडले. त्यावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. सुनील छेत्रीने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. एका गोलमुळे भारतीय संघाने विजय मिळवला.


भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. सुनिल छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय फुटबॉल संघाने एशियन गेम्स स्पर्धेत पहिला विजय मिळवलाय. याआधी चीनविरोधात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण बांगलादेशविरोधात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत स्पर्धेत कमबॅक केले आहे. अटीतटीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १-० च्या फराकाने पराभव केलाय. भारतासाठी कर्णधार सुनिल छेत्री याने अखेरच्या क्षणी गोल केला. या गोलच्या बळावरच भारताने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने 85व्या मिनिटाला केला. भारतीय संघाला चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी बांगलादेशचा म्यानमारविरुद्ध पराभव झाला होता.


भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यात गोलसाठी चांगलीच झुंज पाहायला मिळाली. मात्र, भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेरच्या क्षणी केला. या गोलमुळे भारतीय संघ बांगलादेशचा धुव्वा उडवण्यात यशस्वी झाला.


पहिल्या हाफमध्ये काय झाले...                                                                                          संघांच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्याच्या पूर्वार्धापर्यंत भारत-बांगलादेशच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचा फायदा उठवण्यात अपयश आले. या सामन्याच्या पहिल्या 20 षटकांमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले, मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी