world cup: काय आहे विश्वचषक स्पर्धेचे थीम साँग?

'दिल जश्न बोले'
क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३चे थीम साँग बुधवारी लाँच करण्यात आले. प्रितम, नकाश अजिज, श्रीराम चंद्र, अमित मिश्रा, जोनिता गांधी, आकासा आणि चरण या गायकांनी हे गाणे गायले आहे. 'दिल जश्न बोले' असे या गाण्याचे बोल आहेत. दिग्दर्शक प्रितम चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गाण्याच्या कव्हरवर अभिनेता रणवीर सिंग दिसत आहे.


भारतात ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यासाठी तयारीही जोरदार करण्यात आली आहे. बुधवारी या स्वप्नवत स्पर्धेचे थीम साँग लाँच करण्यात आले. आयसीसीने गत महिन्यात १९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय विश्वचषकाचे मस्कट लाँच केले. महिला गोलंदाज आणि पुरुष फलंदाजाच्या थीमवर ते डिझाइन केले आहेत. पुरुष मस्कट हातात बॅट घेऊन दाखवला आहे आणि महिला मस्कट बॉलसह आहे. आयसीसीने सोशल मीडिया हँडलवर मस्कटचा व्हीडिओ देखील शेअर केला आहे. त्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा दिसत होते.


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. १९ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची