‘दिल जश्न बोले’
क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२३चे थीम साँग बुधवारी लाँच करण्यात आले. प्रितम, नकाश अजिज, श्रीराम चंद्र, अमित मिश्रा, जोनिता गांधी, आकासा आणि चरण या गायकांनी हे गाणे गायले आहे. ‘दिल जश्न बोले’ असे या गाण्याचे बोल आहेत. दिग्दर्शक प्रितम चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. गाण्याच्या कव्हरवर अभिनेता रणवीर सिंग दिसत आहे.
भारतात ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यासाठी तयारीही जोरदार करण्यात आली आहे. बुधवारी या स्वप्नवत स्पर्धेचे थीम साँग लाँच करण्यात आले. आयसीसीने गत महिन्यात १९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय विश्वचषकाचे मस्कट लाँच केले. महिला गोलंदाज आणि पुरुष फलंदाजाच्या थीमवर ते डिझाइन केले आहेत. पुरुष मस्कट हातात बॅट घेऊन दाखवला आहे आणि महिला मस्कट बॉलसह आहे. आयसीसीने सोशल मीडिया हँडलवर मस्कटचा व्हीडिओ देखील शेअर केला आहे. त्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा दिसत होते.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. १९ नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…