Shah rukh khan: 'जवान'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरूखने मानधनात केली वाढ, आता इतके रूपये घेणार

मुंबई: सनी देओलच्या 'गदर २' नंतर आता बॉक्स ऑफिसवर सध्या शाहरूख खानच्या (shah rukh khan) 'जवान'चा बोलबाला आहे. जवान या सिनेमाने सहा दिवसांत वर्ल्ड वाईड तब्बल ६०० कोटींची कमाई केली आहे.


जवानच्या या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरूख खानसह सिनेनिर्माता, दिग्दर्शक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. spotboye च्या रिपोर्टनुसार जवानच्या यशानंतर शाहरूखने आपल्या मानधनात वाढ केली आहे. त्याने हे मानधन वाढवून १०० कोटी इतके केले आहे.


आपल्या आगामी डंकी या सिनेमासाठी तो ६० टक्के नफ्यासह १०० कोटी रूपये इतके मानधन घेणार आहे. दरम्यान याबाबत अद्याप सिनेनिर्माता तसेच किंग खानकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.


डंकी सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या सिनेमात शाहरूखसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. डंकी हा सिनेमा या वर्षी २२ डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमाची निर्मिती गौरी खान करत आहे. आधी पठाण, नंतर जवान आणि त्यानंतर आता डंकीची प्रतीक्षा शाहरूखच्या चाहत्यांना आहे.

Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

आमिर खान प्रोडक्शन्सची सरप्राईज भेट! वीर दासचा ‘हॅपी पटेल’ १६ जानेवारी २०२६ ला प्रेक्षकांसमोर

‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज आमिर खानचा नवीन

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.

धर्मेंद्र यांना कसा दिला अंतिम निरोप ? कुठे आणि कसे झाले अस्थी विसर्जन ?

हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र