Narayan Rane : मराठ्यांना आरक्षण देताना इतरांकडून द्वेष केला जाऊ नये

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावर स्पष्ट केली भूमिका


मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं असलं तरीही अजून आरक्षणाबाबत संपूर्ण निर्णय झालेला नाही. सरकारला त्यासाठी आधी दिलेल्या एका महिन्यात आणखी दहा दिवस वाढवून ४० दिवसांची मुदत जरांगे यांनी दिली आहे. मराठ्यांना न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोणीही त्या निर्णयाचा द्वेष करु नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.


नारायण राणे म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देताना माझा कोणत्याही गोष्टीला विरोध नाही. फक्त सरसकट दाखले देऊ नका. त्याआधी सरकारने संविधानातील घटना १५ (४) आणि १६ (४) यांचा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे सरसकट देण्यापेक्षा सर्वेक्षणाद्वारे मागास लोकांना विचारात घ्यावे. महाराष्ट्रात जवळपास ३८% मराठा समाज आहे, ज्यांना अनेक सुविधांच्या अभावी शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या पुढे जाता आलं नाही, त्यांना आरक्षण मिळावं.


पुढे नारायण राणे म्हणाले, कोणत्याही जातीचं आरक्षण काढून दुसर्‍याला द्यावं, या मताचा मी नाही, अशा प्रकारची काळजी मी यापूर्वीही जेव्हा १६% आरक्षण दिलं तेव्हा घेतली होती. एकाचं काढून दुसर्‍याला आरक्षण देण्यापेक्षा घटनेने तरतूद केल्याप्रमाणे १५ (४) आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यामुळे कोणीतरी आरक्षणाची मागणी केली म्हणून दुसर्‍या कोणीही त्याचा राग धरु नये. यापूर्वी जी वेगवेगळी आरक्षणं देण्यात आली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठेच होते. मराठ्यांनी कधी कोणाला आरक्षणं देताना द्वेष केला नाही त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देताना द्वेष केला जाऊ नये, एवढंच मला वाटतं. असं नारायण राणे म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर