Swami samartha : काळजी नको; श्रीस्वामी समर्थ आज्ञा…

Share
  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

विश्वासराव ऊर्फ आप्पासाहेब माने रहिमतपूर, जिल्हा सातारा येथील राहणारे होते. आप्पासाहेब अक्कलकोटचे राजेसाहेब यांचे मानकरी असल्याने ते अक्कलकोटास राहात असत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली. पण तिला अनुरूप वर कोठे मिळेना. तेव्हा माने यांस चिंता प्राप्त झाली. कन्या रूपाने अप्रितम सुंदर होती. आपले योग्यतेप्रमाणे व मुलीच्या रूपाप्रमाणे वर कसा मिळतो याची आप्पासाहेबांचे मनात निरंतर काळजी लागली. एके दिवशी श्रीस्वामी समर्थांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून आप्पासाहेबांनी महाराजांस विनंती केली, “मुलीस चांगले स्थळ मिळत नाही. महाराजांनी कृपा करावी.”

श्रीस्वामी समर्थांनी जबाब दिला की, “काळजी का करतोस, आम्ही तिला खंड्या नेमला आहे.” आप्पासाहेब यांस आज्ञेचा अर्थ कळेना. पण महाराजांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की, श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला. तेव्हा महाराज यांच्या “खंड्या नेमला आहे” या आज्ञेचा अर्थ कळला. आप्पासाहेब साधारण मानकरी असून, राजाबरोबर कन्येचे लग्न झाले म्हणून त्यांस फार आनंद झाला. आप्पासाहेब यांस पुष्कळ द्रव्य मिळून शिवाय खंडेराव महाराजांनी माने मंडळीस मोठ-मोठाल्या नेमणुका करून दिल्या. आप्पासाहेबांची कन्या म्हणजे बडोद्याच्या श्रीमंत जमनाबाई राणीसाहेब होत्या व माने स्वामीनाम आयुष्यभर घेऊन स्वामीभक्तीत तल्लीन झाले.

जादूई स्वामीनाम चालिसा

स्वामीनाम एवढे गोड
कडूलिंबही लागे गोड॥१॥
साऱ्या चिंता स्वामींवर सोड
स्वामीनामाला नाही जगात तोड॥२॥
ऊस तोड तोड तोड
सोडणार नाही स्वभाव गोड॥३॥
गाईचा पान्हा किती गोड
वासरे झाले बाजू तरी गोड॥४॥
हरिणी देई पाडसा पान्हा गोड
शिकारी थोपवे, बाण, सोड॥५॥
शंकर शंभू प्रसन्न शिकारी भिल्ला
आकाशीच बांधून दिला किल्ला॥६॥
बिल्वपत्र पडले शंकर पिंडी
पोहोचले त्वरित कैलास पर्वत सपिंडी॥७॥
प्रसन्न उमाशंकर पाडस हरिणी
प्रसन्न भोलेनाथ भिल्ल-भिल्लीणी॥८॥
शंकर नामे लाभले व्याध नक्षत्र
स्वामी नामे लाभेल सारे आकाश नक्षत्र॥९॥
ध्रुव बाळा दिसे सर्वत्र विष्णू
जळी स्थळी काष्टी पाषणी विष्णू॥१०॥
भरलाच आहे तो अणू अणू
आकाशीचा ध्रुवतारा अणुरेणू॥११॥
हिरण्यकश्यपू फोडे खांब
खांबांतून अवतरे भोला सांभ॥१२॥
नृसिंह आला बाहेर फोडून खांब
हिरण्यकश्यपूच्या पोटात घुसवूनी नखे लांब॥१३॥
चिरला त्याला तंगड्या करूनी लांब
कापले गाढवासारखे कान लांब॥१४॥
शिवशंभू शिवाजी कापली बोटे लांब
पळाला शाहिस्तेखान बोंबलत लांब॥१५॥
अफझलखान करता भयंकर दंगा
फोडले पोट दाखविली इंगा॥१६॥
औरंगजेबाजाला भरदरबारात दिला इंगा
आग्र्याहून सुटका दाखविला इंगा॥१७॥
जय भवानी जय शिवाजी
हरहर महादेव जय शिवाजी॥१८॥
तलवार तळपली जय भवानी
तलवार तळपली जय भवानी॥१९॥
सारा तोच तो नाममहिमा
रोहीडेश्वराची शपथ महादेव महिमा॥२०॥
हजारो वेळा भक्त घेती ईश्वरनाम
अथवा घ्या कुलदेवतेचे नाम॥२१॥
घ्या गणेशाची शेकडो नाम
घ्या सूर्याची दहा दशक नाम॥२२॥
घ्या शंकराची भोलानाथ नाम
गणपती उमा शंकर प्रदक्षिणा पितानाम॥२३॥
प्रसन्न साक्षात पृथ्वीपती नाम
ओम गणेशाय नमः प्रथम प्राप्त ते नाम॥२४॥
ज्ञानेश्वरा दिधल्ये निवृत्तीनाथ नाम
सोपान, मुक्ताबाई प्रसन्न नाम॥२५॥
तुकाराम लाभले विठ्ठल नाम
अनाथ बालके सनाथ सहनाम॥२६॥
तुका झालासे कळस
विठ्ठल नामाने पळाला आळस॥२७॥
नामदेवे जगभर नेले विठ्ठल नाम
पुंडलिका कोरले विटेत विठ्ठल नाम॥२८॥
श्रावणबाळ अंध मातापिता नाम
बाण लागता दशरथे घेतले विष्णूनाम॥२९॥
कैकेयी मंथरा जग पिडणारी नामे
रावण मेघनाथ कुंभकर्ण नरकातीलच नामे॥३०॥
श्रीलंका पोहोचला घेता हनुमान रामनाम
दगड तरंगला समुद्रावर रामनाम॥३१॥
पूलच बांधला कोरूनी दगड रामनाम
पृथ्वी ते स्वर्ग बांधेल सेतू रामनाम॥३२॥
दिनरात घेई हनुमान रामनाम
लक्ष्मण लाभले औषध घेता रामनाम॥३३॥
लाखो पुण्याचे पुण्य ते राम नाम
अथवा घ्या परिपूर्ण ते दत्तनाम॥३४॥
ब्रह्माविष्णू महेशात सामावले दत्तनाम दत्तनामात सामवले स्वामीनाम॥३५॥
रावणानेही घेतले अंती रामनाम
बालीनेही घेतले
अंती रामनाम॥३६॥
कुंभकर्ण गेला पैलतीरी
अंगी रामनाम राक्षस कुली संपले घेता राम नाम॥३७॥
अर्जुना वाचवले श्रीकृष्ण नाम
द्रौपदी पांडव वाचले घेता श्रीकृष्ण नाम॥३८॥
स्वामी नामातच पवित्र भगवत गीता
भिऊ नको पाठीशी साक्षात स्वामी गीता॥३९॥
स्वामी चरणी पूर्ण करतो स्वामी चालिसा
अमरविलास गातो स्वामी चालिसा॥४०॥

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

2 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

3 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

4 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

4 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

4 hours ago

Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…

5 hours ago