जालना : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीनुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस प्राशन करत अखेर सतराव्या दिवशी जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. यावेळेस मराठा समाजाला आरक्षण केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, अशा भावना जरांगे यानी व्यक्त केल्या. तर मुख्यमंत्र्यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जरांगे, त्यांची टीम, त्यांच्या कुटुंबीयांना मी धन्यवाद देतो. जरांगे समाजासाठी लढत आहेत, यामध्ये त्यांचा वैयक्तिक फायदा नाही, मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी सरळ भूमिका मांडली. जरांगे पाटील यांच्या वडिलांना मी सांगितलं की त्यांचा पोरगा भारी आहे. आमरण उपोषण करणं सोपं नाही, पण तो समाजासाठी लढत आहे. हेतू प्रामाणिक असला की जनता प्रामाणिकपणे मागे उभी राहते. त्यामुळे सर्वांनी जरांगेना पाठिंबा दिला. मी त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. त्यांनी सरबत घेतलं त्याबद्दल मी आभारी आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कटिबद्द आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मनोजप्रमाणे आम्हीही स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
सरकारने याआधी मराठा समाजाला १६ आणि १७ टक्के आरक्षण दिलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने कायदा केला आणि सुप्रिम कोर्टामध्ये ते आरक्षण रद्द झालं. जेव्हा आरक्षण रद्द झालं त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचं धाडस आम्ही केलं. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचं काम आम्ही केलं. पण रद्द झालेलं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे, असं शिंदे म्हणाले.
मराठा समाज आणि सरकार काही वेगळं नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचं हे मी ठरवलं होतं. माझे बाबा गावाला असताना तयारी करत होते. तेही मराठा क्रांती मोर्चात सहभागी होत असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केलं होतं. त्यामुळे आज सतराव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घ्यावेत, अशी विनंती केली आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…