iPhone 15 सीरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Share

मुंबई: Apple ने iPhone 15 सीरीज अंतर्गत दोन हँडसेट  iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच केले आहेत. यावेळेस कंपनीने या सीरीजमध्येही dynamic islandचा वापर केला. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन १४ प्रो सीरिजमध्ये dynamic islandचा वापर केला होता. तर आयफोन १४मध्ये स्टँडर्ड नॉच देण्यात आली होती.

आयफोन १५मध्ये बॅक पॅनेलवर ड्युएल कॅमेरा सेटअपचा वापर करण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी आहे. कंपनीचा दावा आहे की याच्या सहाय्याने चांगल्या डिटेल्समध्ये फोटो क्लिक केले जाऊ शकतात. सोबतच हा फोन फोटोला नेक्स लेव्हलचा एक्सपिरियन्स देऊ शकतो. यात युजर्सला लाईट आणि डिटेल्सचे परफेक्ट बॅलन्स पाहायला मिळेल.

यात Next Genration Portrait मोड मिळेल. सोबतच नवा फोकस मोड मिळेल. हा फोकस मोड लाईट आणि दिवसांच्या प्रकाशात चांगल्या पद्धतीने काम करेल. न्यू स्मार्ट एचडीआरही चांगले फोटो क्लिक करण्यास मदत करेल.

iPhone 15 का डिस्प्ले और कलर वेरिएंट

आयफोन १५मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर आयफोन १५ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आङे. दोन्ही हँडसेटमध्ये OLED super retina डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. आयफोन १५ला पाच विविध रंगात सादर करण्यात आले आहे जे गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहेत.

किंमत

आयफोन १५ची किंमत ७९९ डॉलर(साधारण ६६,१९५ रूपये) तर आयफोन १५ प्लसची किंमत ८९९ डॉलर(साधारण ७४,४८० रूपये)ठेवण्यात आली आहे. आयफोन १५ची भारतात सुरूवातीची किंमत ७९,९९० रूपये असेल तर आयफोन १५ प्लसची सुरूवातीची किंमत ८९,९९० रूपये असेल.

मिळणार रोडसाईड असिस्टंड फीचर

आयफोन १५मध्ये रोड असिस्टंड सर्व्हिसही मिळेल. आयफोन १५ सीरिजच्या युजर्सला दोन वर्षांसाठी मोफत सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फीचर मिळेल. सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीच्या मदतीने युजर्स इमरजन्सीदरम्यान स्थानिक ऑथॉरिटीकडून मदत मिळवू शकतात. सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीशिवाय इंटरनेट आणि सेल्युलर नेटवर्कचेही काम करतो.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

21 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago