गणरायाच्या आरतीला ढोलकी ची साथ

उत्तर प्रदेशचे ढोलकी विक्रेते पेण मध्ये


हिंदूंचे सण खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यात सुरू होत असतात. मात्र यावर्षी अधिक श्रावण आला आहे. या महिन्यात विविध प्रकारच्या सणांसह खऱ्या अर्थाने लगबग सुरू होते ती गणेशोत्सवाची. गणेशोत्सव हा कोकणातील अति महत्वाचा सण संबोधला जात असल्याने या सणाची तयारी आणि खरेदी ही काही दिवस आधीच गणेशभक्त करीत असतात. त्यामुळे व्यावसायिक देखील गणेशभक्तांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आपल्या दुकानात आणून बाजारात विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. त्यातीलच गणेशोत्सवात आरती, भजन, संगीत गाण्यांसाठी लागणारी ढोलकी ही एक महत्वाची बाब आहे. गणेशोत्सव मधील ढोलकीची मागणी लक्षात घेता पेण शहरात उत्तर प्रदेश मधील ढोलकी विक्रेते विक्री साठी दाखल झाले आहेत.


पेण तालुका हा गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास 60 ते 70 टक्के नागरिकांचे गणपती कारखाने आहेत, आणि हे कारखाने ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच जवळपास 90 टक्के गणेशभक्तांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतो. त्यामुळे बाप्पाची पूजा अर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना लागणारी ढोलकी आता पेणच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.


गणेशोत्सव आठ दिवसांवर आला आहे. ढोलकी विक्रेते शहरामध्ये गल्लोगल्ली जाऊन आपल्या गणेशभक्तांसाठी ढोलकी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आतापासूनच पेणमध्ये ठिकठिकाणी ढोलकीचा नाद घुमू लागला आहे. पेणमध्ये डेरेदाखल झालेल्या या ढोलक्या विक्रेते उत्तर प्रदेशहुन आणून येथे आपला व्यवसाय करत आहेत. साधारणपणे छोट्या ढोलक्यांपासून मोठ्या ढोलक्यांपर्यंत 250 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत या ढोलक्या विकल्या जात आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

 Monsoon Food : पावसाळ्यात शरीर उबदार ठेवणारे ८ पारंपरिक पदार्थ

पावसाळ्यात चव आणि आरोग्य दोन्ही जपा आणि हे पदार्थ नक्की खा   गरमागरम मसाला चहा आलं, वेलची आणि दालचिनीचा मसाला

The India Story: Slow Poison in Progress' : द इंडिया स्टोरी'चा टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दैनंदिन जीवनात आपण खात असलेल्या अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा

John Abraham : जॉन अब्राहमची क्रिकेटमध्ये एन्ट्री ! जॉन अब्राहम आता 'या' टीमचा झाला मालक

John Abraham Enters in Cricket : अभिनेता शाहरुख खान तसेच अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलीवूड अभिनेता जॉन

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Nashik : नाशिकच्या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांसाठी पदनिर्मितीस शासनाची मंजुरी, आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश

Nashik : नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयातील (Sandarbh Services Hospital) पेडियाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी व अर्भक