भारतात अनेक मंदिरे आहेत, काही जमिनीवर तर काही डोंगरांवर. या मंदिरांतील ऊर्जा ही चुंबकीय आहे. या मंदिराच्या रचना गूढ आणि अनाकलनीय आहेत. प्रत्येक मंदिरात अध्यात्म, शास्त्र यांचा संगम दिसून येतो.
डोंगरांमध्ये झरे हे जसे बाहेर असतात, तसे आतूनसुद्धा असतात. डोंगरावर असणारी आयुर्वेदिक वनस्पती आणि जल यांच्या मिश्रणाने खनिजनिर्मिती होते. त्यातील दगडांचा काही भाग हा सहज आकार देण्यासारखा असतो. सुरुवातीला ठिसूळ वाटत असला तरी कालांतराने तो खूप टणक होतो.
भारतात अनेक मंदिरे आहेत, काही जमिनीवर तर काही डोंगरांवर. खरं तर मंदिराचे खांब हे सलग एकाच दगडांमध्ये केलेले खूप कमी मंदिरात आहेत. जर नीट निरीक्षण केले, तर कळून येते की, त्याचे अनेक भाग आहेत. मोठ्या मूर्त्यांचे सुद्धा अनेक भाग आहेत. एकसंध दगडातील कोरीव काम सुद्धा आहे. बहुमूल्य आणि मुबलक प्रमाणात असणाऱ्या खनिजनिर्मित डोंगराच्या मातीतूनच मंदिराचे भाग जोडण्यात येत असे. ते अतिशय बेमालुम पद्धतीने जोडले गेलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो की, हे दगड या भागातले नाहीत; परंतु ते त्याच भागातील जवळपासचे आहेत. कारण विविध दगडांमध्ये जर खनिज निर्मितीमुळे एखादा दगड वेगळ्या गुणधर्माचा असेल, तर त्याची निवड प्राचीन काळात कलाकृतींसाठी केली जात असे. प्राचीन मंदिरातील अस्ताव्यस्त पडलेल्या अवशेषांवरून हेच लक्षात येते की, विविध प्रकारच्या कलाकृती या तिथेच बनत असे आणि मग त्याचे जोडकाम होत असे. त्या काळात इतर कोणतेही वेगळे काम नसल्यामुळे सर्व कलाकार यामध्ये आपली कला ओतप्रोत भरीत असे.
प्राचीन मंदिरांच्या किमान इतर कोणत्याही कलाकृतींच्या अंतर्गत विविध शास्त्रांतील अनेक लोक जोडली जात असत. वास्तुशास्त्रज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ, कलाकार, प्रकल्पयोजक, पंडित, वैज्ञानिक, आयुर्वेदाचार्य, ज्योतिषी, रत्नपारखी अशा अनेक ज्ञानी व्यक्तींचा समावेश असे आणि म्हणूनच प्रत्येक मंदिरात त्याची विविधता, ज्ञान आणि सकारात्मकता दिसून येते. प्रत्येक मंदिरात अध्यात्म आणि शास्त्र याचा संगम दिसून येतो. आत्ता अमेरिका किंवा इतर जग जे शोध लावत आहेत, ते फार प्राचीन काळी आपल्या अध्यात्म आणि विज्ञानाने लावलेले आहेत. जर आपण हिंदू धर्मातील संस्कृती आणि संस्कारांचा अभ्यास केला, तर याची प्रचिती आपल्याला येईल. सर्व जगात सकारात्मकता आणण्याचे कार्य हे फक्त आणि फक्त भारतीय हिंदू धर्मातच खूपच उच्च प्रतीचे आहे.
ही सर्व मंदिरे म्हणजे अद्भुत किमया आहे, या परमेश्वराची आणि परमेश्वररूपी परिपूर्ण मानवाची. सामान्य मानव हे कधीच समजू शकणार नाही. या मंदिरांतील ऊर्जा ही चुंबकीय आहे. या मंदिराच्या रचना गूढ आणि अनाकलनीय आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत अगदी पृथ्वीपासून ते जीवसृष्टीपर्यंत सर्व सर्व काही आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये परिपूर्णपणे आणि अभ्यासपूर्वक आपल्या ऋषीमुनींनी दिलेले आहे.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…