Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीKopardi rape case : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची तुरुंगात आत्महत्या

Kopardi rape case : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची तुरुंगात आत्महत्या

गळफास लावत संपवलं आयुष्य

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या (Kopardi rape case) केल्याच्या आरोपाखाली जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) हा आरोपी पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerawada jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र, आज सकाळी पोलीस गस्तीवर गेले असता त्यांना जितेंद्रने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचे निदर्शनास आले. तुरुंगात आरोपीने आत्महत्या करणं ही मोठी गोष्ट असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेने आत्महत्या करत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच अधिकारी तिथे पोहोचले. त्याने स्वत:च्या कपड्यांनी गळफास लावून घेतल्याचे समजत आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन करण्यात येईल.

१३ जुलै २०१६ रोजी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांनी मिळून कोपर्डीमध्ये एका शाळकरी मुलीवर अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली. या अमानुष कृत्यामुळे अख्खं राज्य पेटून उठलं होतं. या प्रकरणात इतर दोन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर जितेंद्र शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. मात्र आज त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -