
नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (rishi sunak) शनिवारपासून सुरू होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी (g-20 summit) शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचले. पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह सुनक यांचे पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, भारतात ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि वरिष्ठ राजनायकांचे स्वागत केले. पाहुण्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक नृत्याचे कौतुक केले. आपल्या तीन दिवसीय भारत यात्रेदरम्यान सुनक पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करतील.
खास बाब म्हणजे केंद्रीय मंत्री चौबे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांचे त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर अभिनंदन करताना जय सियाराम असे म्हणत अभिवादन केले. अश्विन चौबे यांचे मीडिया सल्लागार पंकज मिश्रा यांनी सांगितले की स्वागतादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी ब्रिटनचे पंतप्रधानांनी त्यांच्या पूर्वजांच्या धरतीवर स्वागत करत जय सियाराम असे म्हटले.
केंद्रीय मंत्री चौबे यांनी आपण बिहारच्या बक्सरचे खासदार असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांना सांगितले. यासोबतच ब्रिटीश पंतप्रधानांना बक्सरचे महत्त्वही सांगितले.
या केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान ऋषि सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांना भारताचे जावई आणि मुलीच्या रूपात स्वागत केले. केंद्रीय मंत्री चौबे म्हणाले की भारतभूमी ही तुमच्या पूर्वजांची भूमी आहे. तुम्ही येथे आल्याने साऱे उत्साहित आहेत. केंद्रीय मंत्री ऋषी सुनक यांना यावेळी केंद्रीय मंत्री चौबे यांनी रुद्राक्ष, श्रीमद्गभगवतगीता आणि हनुमान चालिसा भेट दिली.