By election Result: पोटनिवडणुकीत ७ पैकी ३ जागांवर भाजपचा विजय, घोसीमध्ये सपाला मोठा विजय

नवी दिल्ली : सहा राज्यांताली ७ विधानसभा जागांवरील पोटनिवडणुकीत(by election) भारतीय जनता पक्षाने (bjp) तीन जागांवर विजय मिळवला आहे. यात त्रिपुरा येथील दोन, उत्तराखंडच्या बागेश्वर विधानसभा जागेचा समावेश आहे. तर झारखंडने डुमरी विधानसभेच्या जागेवर एनडीएच्या उमेदवाराल झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराने चांगली लढत दिली.


केरळच्या पुथुपुल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या धुपगुडी विधानसभा मतदार संघात टीएमसीच्या उमेदवाराने विजय मिळवला. तर उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदार संघात समाजवादी पक्षाच्या उमेदवार सुधाकर सिंह यांनी मोठा विजय मिळवला आहे.


घोसी विधानसभा पोटनिवडणूक - घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत सपाचा ऐतिहासि विजय. सपाचे आमदार सुधाकर सिंह यांनी ३४व्या टप्प्यात ४२७६३ मतांनी विजय मिळवला.


धुपगुडी विधानसभा पोटनिवडणूक - तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांनी धुपगुडी मतदारसंघातून विजय मिळवला.


बागेश्वर विधानसभा पोटनिवडणूक - उत्तराखंडमधील बागेश्वर विधानसभा मतदारसंघातूि भाजपच्या उमेदवार पार्वती दास यांनी विजय मिळवला आहे. त्यांना ३३२४७ मते मिळाली.


झारखंड डुमरी विधानसभा पोटनिवडणूक - डुमरी विधानसभा मतदारसंघातून झामुमोच्या उमेदवार बेबी देवी यांनी एनडीच्या उमेदवाराला हरवले.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू