Swami Samartha : ‘तुझे इच्छित कार्य पुरे होईल’

  244


  • समर्थ कृपा : विलास खानोलकर


एकदा श्री स्वामी समर्थ मुरलीधर मंदिराजवळ असलेल्या साखर विहिरीजवळ एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. त्याच्या दर्शनासाठी अनेकजण उभे होते. त्याच वेळी हैदराबादहून आलेला एक यवन दर्शनासाठी उभा होता. त्याने छलकपट बुद्धीने श्री स्वामींस वंदन करून प्रार्थना केली की, ‘अहो, माझ्यापाशी खर्च करण्यासाठी म्हणून एक पैसाही नाही. आपण खर्चासाठी पैसे देता, असा आपला लौकिक आहे. आता मला काही कामासाठी मुंबापुरीला तत्काळ जायचे आहे, तरी काही पैसे द्याल का?’
त्याचे बोलणे संपताच त्रिकालज्ञानी श्री स्वामी त्यास कठोर भाषेत म्हणाले, ‘अरे, तू कमरेला पंधरा रुपये बांधून आला आहेस आणि आमच्याशी खोटे बोलतोस? शिवाय तुझ्याजवळच्या गाठोड्यात सोन्याचे मौल्यवान दागिने आहेत. तरीही कपटी मनाने एकही पैसा माझ्याकडे नाही, असे खोटे सांगतोस काय?’


त्या यवन शिपायास लाज वाटून त्याने मान खाली घातली. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने त्याच्याजवळील दागिने आणि रुपये काढून लोकांस दाखवले. तेव्हा तो यवन शिपाई श्री स्वामींस ‘आप-खुद-खुदा-अल्लाह-ईसाइ-रहिमान हो. माझ्या अपराधाची मला क्षमा करा. आम्ही स्वार्थी प्रापंचिक आहोत. अज्ञानाने कपट ठेवून छल बुद्धीने वावरतो. देहाभिमान बाळगून मदांधतेने जगतो.’ कृपाळू श्री स्वामी त्यास म्हणाले, ‘आता तू मुंबापुरीला जा. तुझे इच्छित कार्य होईल.’ गैरवर्तनानंतर सुद्धा कृपेने बोल ऐकावयास मिळाले म्हणून तो यवन शिपाई संतुष्ट मनाने तेथून
निघून गेला.



स्वामीच गुरूदत्ता, स्वामीच कृष्ण भक्ता


स्वामी बैसले छायेत तरुतळी
आलेला यवन तळमळी॥१॥
सांगे सारे संसार जळमळी
पैशाच्या मदतीसाठी तळमळी॥२॥
असूनी खिशात पैसाअडका
स्वामीस सांगे मी आहे कडका॥३॥
स्वामींचा उडाला भडका
स्वामींनी यवनाला दणका॥४॥
खिशात तुझ्या पैसा अडका
खोटा दिखाता है कडका कडका॥५॥
तुझे डोके आहे मडका
चल पळत सुट बेडका॥६॥
ऐकून यवन झाला शरमिंदा
माफ करा अल्ला खाविंदा॥७॥
मी झूट बोललो शरण गोविंदा
पाया पडतो अल्ला खुदा॥८॥
स्वामी आली यवन दया
प्रेम स्वीकारले वदले जया॥९॥
तुझे कार्य होईल पूर्ण जया
शरणार्थीला यशाचे दान तया॥१०॥
स्वामींना सारे कळते भूतभविष्य
भक्तांचे सदा कल्याण भविष्य॥११॥
स्वामींचे सारेच कार्य अतिभव्य
स्वामींना जा शरण नको पैसाद्रव्य॥१२॥
स्वामीसमर्थ मंत्र सदा जपा
आई-वडील मुलाबाळा जपा॥१३॥
आपले भविष्य उज्ज्वलते जपा
स्वामींवर सारे काही सौपा॥१४॥
मना सज्जना भक्तीपंथेची जावे
सदा उत्तम ते ते करावे॥१५॥
इतरांचे कधी वाईट चिंतू नये
मेलेल्या शत्रूलाही मारू नये॥१६॥
सदा इतरांचे हीत चिंतावे
नेहमी चांगलेच वदावे॥१७॥
ईश्वर आपणासी दहा हाते देतो
आपण पाहा काय देतो॥१८॥
करीबा दान धर्मा तो करावा
सदा हित नेहमी स्मरावा॥१९॥
उत्तम कार्यात देव तो जोडावा
अति वाईट गुण तो तो सोडावा॥२०॥
चांगलाच मित्र तो जोडावा
चांगला गुरू तो पूजावा॥२१॥
गुरुबंधू उत्तम पूजावा
गुरुपिता नेहमी मानावा॥२२॥
दत्तगुरू माता जणू स्व माता
दत्त पिता ऋषी खरा खजिना॥२३॥
सगुणी पिता खरा पूजावा
माता जग्नतामा रोज पूजावा॥२४॥
तूच गोपाळ कृष्ण
तूच राधे कृष्ण॥२५॥
तूच गीतेतला कृष्ण
तूच अर्जुनाचा कृष्ण॥२६॥
तूच समर्थ नाही प्रश्न
पुराण पुरुष तूच पुराण॥२७॥
तूच ब्रह्मा विष्णू महेश
तूच दत्तदिगंबर महेश॥२८॥
तूच ॐ नमो शिवाय
नमो महादेवाय॥२९॥
तूच सांगितली जीवनाची गीता
तूच सांगितली युद्धाची गीता॥३०॥
तूच सांभाळलीस रामसीता
तूच शिकवले लव-कुश गीता॥३१॥
तूच फोडली मथूरेत दहीहंडी
तूच ढवळलीस शिर्डी भंडारा हंडी॥३२॥
जळीस्थळी तूच स्वामी
तूच सांभाळलेस भक्ता स्वामी॥३३॥
कार्य तुझे सर्वत्र दूरगामी
तूच मातापिता मामामामी॥३४॥
जेव्हा शत्रू लागे गुरुगुरू
आठवतो माझा स्वामी गुरू॥३५॥
वस्त्रहरणात तूच वाचविली दौपदी
मदतीला धावलास तू पदोपदी॥३६॥
मुष्ठीप्रहार करूनी मारलास कंस
कालियामर्दन करून वाचविले भक्त वंश॥३७॥
गोवर्धन पर्वत उचलूनी वाचविले गोवंश
युद्धात वाचविले पांडववंश॥३८॥
थोपविला तू नरसंहारा
तूच बनलास भक्त सहारा॥३९॥
भक्त विलास सांगे स्वामी महती
चालिसा पूर्ण करतो स्वामी भक्ती॥४०॥


vilaskhanolkardo@gmail.com



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण